

Illegal tree cutting and illegal transportation
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. तसेच ट्रॅक्टर तसेच अन्य वाहनातूक दिवसा खु-लेआम वाहतूक करण्यात येत आहे. याकडे वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे. हिसोडा, करंजगाव आदी परिसरातुन बाभूळ आंबा, लिंब आदी झाडांची मोठ्या प्रमाणात अवैध तोड सुरु आहे. दिवसा खुलेआम चारचाकी वाहनांद्वारे वाहतूक केल्या जात आहे.
अवैध वृक्षतोडीकडे वनविभाग व महसूल विभागाचे काही कर्मचारी बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. वृक्षतोड करणाऱ्यांकडून बहुपयोगी बाभुळ व लिंबाच्या वृक्षांची सर्वाधिक कत्तल केली जात आहे. त्यामुळे वृक्षप्रेमींमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे.