Police destroy four quintals of marijuana
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात आष्टी, परतूर, जाफराबाद, भोकरदन, टेभुर्णी, तालुका जालना, बदनापूर, गोंदी, कदिम जालना, चंदनझिरा जालना, मौजपुरी, हसनाबाद व अंबड पोलिस ठाण्यांतंर्गत पकडण्यात आ-लेला गांजा, गांजा व अफुची झाडे जालना पोलिस मुख्यालयाच्या आ-वरात नष्ट करण्यात आले. याचे वजन ४ क्विंटल ५३० ग्राम एवढे होते.
जालन्याचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त अमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यातील आष्टी, परतूर, जाफराबाद, भोकरदन, टेभुर्णी, तालुका जालना, बदनापूर, गोंदी, कदिम जालना, चंदनझिरा जालना, मौजपुरी, हसनाबाद व अंबड पोलिस ठाण्यांतर्गत पकडण्यात आलेला गांजा, गांजा झाडे व अफुची झाडे जप्त करण्यात आले.
पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, प्रभारी पोलिस उपअधीक्षक बी. एन. रयतुवार, सहायक रासायनिक विश्लेषक हकिकुल्ला हमीदुल्ला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी रवींद्र जाधव, वैध मापनचे रिपेरर निरीक्षक शेख इरफान शेख रफिक, अग्नी शामक दल महानगरपालिका जालना, स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे, सचिन खामगळ इंगेवाड, पोलिस अंमलदार भाऊराव गायके, प्रशांत लोखंडे, रुस्तुम जैवाळ, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, विजय डिक्कर, जगदीश बावणे, सोपान क्षीरसागर, रमेश काळे, सचिन राऊत, किशोर पुंगळे, सौरभ मुळे, भरत कडुळे यांची यावेळी उपस्थिती होती.