Pimpalgaon Renukai Preparations for Navratri festival in full swing, various religious programs including Ghatasthapana in temples
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे रेणुकामाता नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवानिमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात परराज्यातील भाविक दर्शनासाठी पिंपळगाव रेणुकाई येथे गर्दी करीत असून संस्थानच्यावतीने मंदीरात घटस्थापना, अखंड हरिनाम सप्ताह, श्री ज्ञानेश्-वरी पारायण सोहळ्यासह विविध कार्यक्रमाचे अयोजन करण्यात येते.
पिंपळगाव रेणुकाई येथील रेणुकामाता मंदीरात २२ रोजी घटस्थापनेनंतर विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. यावेळी बुलढाणा येथील भगवान महाराज यांच्या नेतृत्वात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्यसनमुक्ती, समाजातील विषमता जाऊन राष्ट्रभाव जागृत व्हावा, अंधश्रध्दा निर्मूलन व्हावे, यासाठी साधुसंत मार्गदर्शन करणार आहेत.
रेणुकामाता मंदिरात सकाळी ४ ते ६ देवीची काकडा आरती, सकाळी ६ ते ७ विष्णू सहस्स नाम, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, १० ते ११ गाथा भजन, २ ते ४ भावार्थ रामायण, ४ ते ५ प्रवचन. सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ८.३० ते १०.३० हरिकीर्तन व नंतर हरीजागर होणार आहे.
धार्मिक कार्यक्रमात गोविंद महाराज गोकुळकर, सोमवारी श्री क्षेत्र पंढरपुर येथील श्याम महाराज बोरुडे, तपोवन येथील सखाराम महाराज, सजय महाराज पाटणकर, ऋषिकेश महाराज देशमुख, ज्ञानेश्वर महाराज राऊत, अंबादास महाराज लोखंडे, लीलाधर महाराज पाटील ओझास्कर, भाऊसाहेब महाराज पवार, बाबुराव महाराज काळे,. गोविंद महाराज गोकुळ, विठ्ठल महाराज शिंदे, महंत देवेंद्र चैतन्य स्वामी,. महंत महादेव महाराज गिरी, ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर, विष्ण महाराज सास्ते, भगवान बाबा बुलडाणा यांचे प्रवचन होणार आहे.
रेणुका देवी संस्थान च्या वतीने नऊ दिवस चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी गावातील नागरिकांच्या सहकायनि मोठ्या उत्साहात सप्ताह पार पडत असतो त्यामुळे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी संस्थांच्या वतीने बंदोबस्त करण्यात आला आहे.गणेशराव देशमुख, रेणुकादेवी संस्थान अध्यक्ष