Crime News : वाटूर फाटा येथे पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला मारहाण file photo
जालना

Crime News : वाटूर फाटा येथे पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला मारहाण

मोफत पेट्रोल दे, नसता पेट्रोलपंप फुंकुन देण्याची धमकी

पुढारी वृत्तसेवा

Petrol Pump Manager Assaulted at Watur Phata

परतूर, पुढारी वृत्तसेवा : परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथील पेट्रोल पंपावर रांगेत वाहन न लावता ते आडवे उभे करीत पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपयांचे डिझेल मोफत दे असे म्हणत मॅनेजर आणि कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना इंडियन पेट्रोल पंपावर घडली. यावेळी संशयीत आरोपींनी माचिसने पेट्रोल पंप फुंकून टाकीन अशी धमकीही दिल्याचा आर-ोप आहे. याप्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाटूर फाटा येथील इंडियन पेट्रोल पंपावर रामचंद्र लक्ष्मणराव यादव हे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. रात्रीच्या वेळी संशयीत आरोपी करण सुरेश सदावर्ते आणि मिलिंद सुरेश सदावर्ते (दोघे रा. ढगी, ता. जि. जालना) हे अर्टिगा कार (क्र. ०५ १७७१) घेऊन पेट्रोल पंपावर आले. त्यांनी गाडी रांगेत न लावता थेट आडवी लावली यावेळी पंपावरील कर्मचाऱ्यानी त्यांना योग्य पद्धतीने गाडी लावण्यास सांगितले असता, दोन्ही आरोपींनी कर्मचाऱ्याची कॉलर पकडुन दोन हजार रुपयांचे डिझेल मोफत टाक असे म्हणत त्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरू केली.

पेट्रोल पंपावर सुरू असलेला हा राडा पाहून मॅनेजर रामचंद्र यादव हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेले. यावेळी आरोपींनी यादव त्यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यातच करण सदावर्ते याने यादव यांच्या उजव्या पायावर लाथ मारली, तर मिलिंद सदावर्ते याने हातात असलेल्या कोणत्यातरी कडक वस्तूने त्यांच्या गुडघ्यावर मारून गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे. यावेळी पेट्रोल पंप माचिसने फुंकून टाकू, अशी धमकी देऊन आरोपींनी पंपावर दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

दहशतीचे वातावरण

वाटुर पेट्रोल पंपावर झालेल्या या राडा व गुंडगिरीमुळे तालुक्यातील पेट्रोल पंप चालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आरोपींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

या घटनेनंतर मॅनेजर रामचंद्र यादव यांनी। तत्काळ परतूर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास पोउपनि नंदू खंदारे हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT