Cattle smuggling pudhari photo
जालना

Cattle smuggling : गोवंशाची अवैध वाहतूक; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

तिघा जणांविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

परतूर : पारडगाव कडून येणाऱ्या परतूर- आष्टी रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गोवंश जातीची जनावरे डांबून कत्तलीसाठी घेऊन जाणारा पिकअप (क्र. एमएच २० एफक्यू ७७९७) पकडण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख ५४ हजार रुपयां किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, तिघा जणांविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत आठ जणावरांची सुटका करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस ठाण्यातील अमलदार गजानन पवार, पोहेको जनार्दन पालवे, होमगार्ड गणपत चव्हाण, शेख हे गस्तीवर असताना, पारडगावकडून परतूरकडे एक बोलेरो पिकअप गोवंश जनावरे भरून येत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे उड्डाणपुलाजवळ सापळा रचून सदर पिकअप वाहन थांबवले.वाहनाची पाहणी केली असता, त्यात गायी, गोरे व कारवडी अशा एकूण ८ गोवंशीय जनावरांना कसलाही चारा-पाणी न देता अत्यंत क्रूरपणे क्रूरतेने डांबून कत्तलीसाठी वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले.

वाहन चालकाकडे परवाना व कायदेशीर दाखले मागितले असता, त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र आढळले नाही. या कारवाईत २ लाख ५४ हजार रुपये किमतीची ८ गोवंशीय जनावरे आणि ४ लाख रुपये किमतीचा बोलेरो पिकअप असा एकूण ६ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अंमलदार गजानन पवार यांच्या फिर्यादीवरून इजरान अब्दुल रौफ शेख, मस्जिद करीम शेख, यासीन करीम शेख (सर्व रा. पारडगाव, ता. घनसावंगी) यांच्याविरुद्ध परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT