परतूर : महागड्या दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकून त्यांच्याकडून महागड्या तेरा दुचाकी जप्त केल्याची कारवाई पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील व तालुक्यातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी वेळोवेळी सुचना देऊन आदेशीत केलेले होते. त्यावरुन पोलीस निरीक्षक एस.बी.भागवत यांनी पोलीस ठाणे परतुर येथील अधिकारी अंमलदार यांचे एक मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एक तपास पथक नेमलेले आहे. पथकातील अधिकारी अंमलदार हे परतुर शहरातील व तालुक्यातील चोरीस गेलेल्या मोटारसायकलचे तांत्रीक विश्लेषण करीत होते.
दि 1/08/2025 रोजी पोलीस निरीक्षक भागवत यांना माहिती मिळाली की, पोलीस ठाणे परतुर येथे गुरनं 382/2025 कलम 303(2) BNS प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयाती मोटारसायकल ही परतुर-वाटुर रोडवरील बालाजीनगर येथील हॉटेल मोक्ष समोर काही इसमांनी चोरुन नेलेली आहे. त्यावरुन भागवत यांनी पथकातील अधिकारी अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना देऊन आदेशीत केले होते.
पथकातील अधिकारी अंमलदार यांनी मौजे लिंगसा ता. परतुर येथुन इसम विष्णू दादाराव माने वय 20 वर्ष रा.लिंगसा ता. परतुर जि. जालना यास ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार वैभव ज्ञानेश्वर धरपडे वय 21 वर्ष रा. सादोळा ता. परतुर जि. जालना, सुभाष उर्फ राजेश प्रभाकर जाधव वय 25 वर्ष रा.लिंगसा ता. परतुर जि. जालना याच्यासह केल्याचे सांगितले. सदर आरोपीतांकडुन नऊ लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या चोरलेल्या एकुण तेरा मोटारसायकली जप्त केलेल्या आहेत.सदर आरोपीतांनी मोटारसायकली हया जालना, बीड, छत्रपती संभाजीगनर या जिल्हयातुन विविध ठिकाणावरुन चोरुन आणल्याचे सांगितल्याने आणखी गुन्हे उघडकीस येणार आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक अजयकुमार बसंल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे परतुरचे पोलीस निरीक्षक एस.बी. भागवत, पोउपनि अमोल रावते, अंमलदार धर्मा शिंदे, किरण मोरे, गजानन राठोड, विजय जाधव, भागवत खाडे, नरेंद्र चव्हाण, दशरथ गोपनवाड, सॅम्युअल गायकवाड, पवनकुमार धापसे आय.टी. सेल अंमलदार सागर बाविस्कर यांनी केलेली आहे.