Wheat Crop News File Photo
जालना

Wheat Crop Disease : गहू पिकावर पिवळसर रंगाच्या रोगाचा प्रादुर्भाव

आन्वा : पिके पडू लागली पिवळी, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

पुढारी वृत्तसेवा

Outbreak of yellow disease in wheat crop

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण व दमट हवामान तर रात्री गारवा तर पहाटे कडाक्याची थंडी अशा बदलत्या वातावरणाचा फटका तालुक्यातील गहू पिकाला बसला असून हे पीक पिवळसर पडत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होऊ लागले आहेत.

दरम्यान कडाक्याची थंडी व ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे तर गव्हावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मावा रोगामुळे तालुक्यातील सुमारे २० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र धोक्यात आले आहे. सध्या पिकांवर या वातावरणाचा परिणाम होत असल्याने शेतकरीवर्ग संकटात सापडला असून आता तो पूर्णपणे हबकून गेला आहे.

यावर्षी भोकरदन तालुक्यात अवकाळी परतीच्या पाऊस पडल्यामुळे साठवण बंधारे पूर्णक्षमतेने भरले आहे. विहिरी, बोअरवेल, पाझर तलावात मुबलक पाणी असल्याने तसेच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळे बांधलेले असून त्या माध्यमातूनही पाणी उपलब्ध झालेले असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे २० हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी केली आहे. मात्र सुरुवातीच्या काळात ढगाळ वातावरणामुळे पिकांची पूर्णता वाट लागली आशाही स्थितीत शेतकरी वर्गाने औषधांची मात्रा वापरीत पिकांवरील रोगांना नियंत्रणात आणले. मात्र गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे व त्यानंतरच्या ढगाळ हवामानामुळे गव्हावर पिवळसर रंगाचा रोग व मावा किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे.

गव्हाचे पिकावर दोन प्रकारचे मावा दिसून येतो. एकाचा रंग पिवळसर तर दुसऱ्याचा रंग हिरवा असतो. हे कीटक लांब व वर्तुळाकार असते. या किडीचे पिल्ले व प्रौढ मावा पानातून व कोवळ्या शेंड्यातून रस शोषन करतात. तसेच आपल्या शरीरातून मधासाखा गोड व चिकट पदार्थ सोडतात. व त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. जादा औषध फवारणी करूनही मावा आटोक्यात येत नसल्याने पीक धोक्यात आले आहे.

पिकांची वाताहत

आज कडाक्याची थंडी तर उद्या ढगाळ वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकांवर कोणती औषध फवारणी करावी असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. ढगाळ हवामानामुळे गहू पिकावर मावा किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून किडीच्या विश्तेद्वारे गव्हाच्या पानावर, खोडावर तसेच कोवळ्या शेंड्यावर असलेल्या माव्यामुळे पिकांची वाताहत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT