Only 7 percent of family planning surgeries achieved target
जालना, पुढारी वृत्तसेवा : वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया उद्दिष्टानुसार व्हाव्यात यासाठी सूचना दिल्या जातात. परंतु, दिलेल्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत केवळ ७ टक्केच उद्दिष्टे गाठण्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला यश आले आहे.
दरम्यान, 'हम दो हमारे दो'चा नारा देत लोकसंख्या वाढीला आळा घालण्याचे प्रयत्न शासन स्तरावरून केले जातात. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट जिल्हानिहाय दिले जाते. गतवर्षी ६,९१२ शस्त्रक्रिया झाल्या होत्या, यात १२ पुरुष वगळता सर्वच्या सर्व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया महिलांनी करून घेतल्या आहेत. सुमारे ६,९०० महिलांच्याच शस्त्रक्रिया झाल्या होत्या.
विशेष म्हणजे अनेक केंद्रांना दिलेल्या उद्दिष्टानुसार शस्त्रक्रिया हालेल्या नाहीत. यंदाही तब्बल ११ हजार ३७७ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आजवर केवळ ७ टक्केच उद्दिष्ट आरोग्य यंत्रणेला साध्य करता आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. चालू वर्षात जिल्हा आरोग्य यंत्रणेला ११ हजार ३७७ शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गत वर्षभरात आरोग्य विभागाच्या वतीने ६,९१२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. पुरुषांमध्ये नसबंदीबाबत गैरसमज आहेत.
पाटोदा
२४७
पिंपळखेड
१३६
कुंभारझरी
१२५
वरूड
१६१
दाभाडी
२१५
राजाटाकळी
८५
हसनाबाद
१९६
कुंभार पिंपळगाव १४८
राणीउंचेगाव
१५२
रांजणी
१०९
गत वर्षभरात ६,९०० महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत, तर केवळ १२ पुरुषांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सुमारे ६९१२ इतक्या शस्त्रक्रिया झाल्या होत्या. नसबंदी केल्यानंतर विविध शारीरिक समस्या उद्भवतात, असा गैरसमज असल्याने पुरुष नसबंदी करीत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
उद्दिष्टशनुसार शस्त्रक्रिया व्हाव्यात, आमच्या प्रयत्न केल्या जात आहे. त्यासाठी वेळोवेळी आढावा घेतला जातो.-डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जालना.