One killed in pickup-bike accident; One is serious
धावडा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील धावडा गावाजवळ पिक अप व दुचाकीचा भीषण अपघात होऊन त्यात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.
भोकरदन तालुक्यातील धावडा गावाजवळ अजिंठा बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गावर १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास भरधाव पिकप (एमएच-३०-५६३९) ने दुचाकी (एमएच-२८-९५१५) ला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील कुंदन मनोहर गायकवाड (४४) हा ठार झाला तर पंडित नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला.
या अपघाताची माहिती पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सरपंच विलास बोराडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने जखमींना बुलढाणा येथील रुग्णालयात हलवले. सपोनी संतोष माने यानी मयत कुंदन मनोहर गायकवाड यास वालसावंगी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
तेथे त्याच्यावर शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या पंडीत यास बुलढाणा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन अपघातात त्याचा पाय फ्रैक्चर झाला असल्याची माहीती ऐकावयास मिळाली.
दुचाकी ही धावड्याकडून गिरड्याकडे जात करतांना दुचाकीची बुलढाण्याकडुन अजिंठ्याकडे जाणाऱ्या पिकअपशी धडक झाली. अपघातानंतर पिकअप चालक पारध पोलिस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक संतोष माने हे करीत आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिस व पारिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्तांची मदत केली. या प्रकरणी पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.