Jalna-Chhapra Special train : जालना-छपरा स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढणार file photo
जालना

Jalna-Chhapra Special train : जालना-छपरा स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या वाढणार

प्रवाशांना दिलासा, नियमित रेल्वे सुरू करा

पुढारी वृत्तसेवा

Number of trips for the Jalna-Chhapra Special train to increase

जालना, पुढारी वृत्तसेवाः उत्तर भारतीय प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन जालना-छपरा स्पेशल रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे जालना, मराठवाडा आणि परिसरातील उत्तर भारतीय नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ऑक्टोबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आलेल्या गाडी क्रमांक ०७६५१ जालना-छपरा स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या २५ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०७६५२ छपरा-जालना स्पेशल ट्रेन २७नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. या गाडीची अखेरची फेरी २८ ऑक्टोबर रोजी जालना येथून छपरासाठी रवाना होणार असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

जालना-छपरा स्पेशल ट्रेनच्या फेऱ्या नोव्हेंबर महिन्यातही सुरू राहणार आहेत. या गाडीच्या फेऱ्या बुधवार, ४, ११, १८ आणि २५ नोव्हेंबर रोजी नियोजित आहेत. परतीच्या प्रवासात छपरा-जालना स्पेशल ट्रेन गुरुवार, १३, २० आणि २७ नोव्हेंबर रोजी धावणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जालना आणि मराठवाड्यात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड तसेच मध्य प्रदेशातील नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. रोजगार आणि व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलेल्या या नागरिकांना सणासुदीच्या काळात आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे प्रवासाचा आधार घ्यावा लागतो. मात्र, नियमित गाड्यांमध्ये मोठी गर्दी होत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

या पार्श्वभूमीवर जालना-छपरा विशेष रेल्वे सुरू ठेवण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. विशेष ट्रेनच्या फेऱ्या वाढल्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि उत्तर भारतात जाणाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फायदा होणार

नियमित रेल्वेसेवेचीही मागणी विशेष गाड्या केवळ सणासुदीच्या काळापुरत्या न ठेवता त्या नियमित स्वरूपात चालविण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. जालना-छपरा मार्गावर कायमस्वरूपी रेल्वेसेवा उपलब्ध झाल्यास मराठवाड्यातील हजारो प्रवाशांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT