अडीचशेहून अधिक एनसीएमसी कार्ड नोंदणी 
जालना

NCMC card : सवलतीच्या प्रवासाला आता 'एनसीएमसी' कार्डची अट

३१ ऑगस्टची डेडलाईन; जालन्यात दोन लाख २२ हजार कार्डाची नोंदणी

पुढारी वृत्तसेवा

NCMC card now a condition for discounted travel

जालना, पुढारी वृत्तसेवा : १ सप्टेंबर २०२६ पासून एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्डशिवाय सवलतीच्या दरात एसटी प्रवास करता येणार नाही. त्यामुळे सवलतीस पात्र असलेल्या प्रवाशांनी ३१ ऑगस्टपूर्वी स्मार्ट कार्ड काढून घेणे आवश्यक आहे. अन्यथा १ सप्टेंबरपासून सवलतीऐवजी १०० टक्के प्रवास भाडे भरावे लागणार आहे.

जालना जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत २ लाख २२ हजार ५५८ प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ३० हजार ४ प्रवाशांना कार्डचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, अद्याप मोठ्या संख्येने नोंदणीकृत प्रवासी स्मार्ट कार्डच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये स्मार्ट वाशांच्या सेट एसटी महाराष्ट्र राज्य परिवह कार्डसाठी नोंदणी सुरू असून, जालना आगारात सर्वाधिक १ लाख ६२ हजार ४१३ प्रवाशांनी नोंदणी केली आहे. यापैकी ८९ हजार ७२१ प्रवाशांना स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित नोंदणीकृत प्रवाशांनी विलंब न करता संबंधित आगाराशी संपर्क साधून कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी आता एनसीएमसी कार्ड महत्त्वाचे ठरणार आहे.

१ सप्टेंबरपासून सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे अद्याप कार्ड नाही, त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी कार्ड काढणे आवश्यक आहे. स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांची पात्रता आणि सवलतीचा लाभ डिजिटल पद्धतीने नोंदविता येणार असून, भविष्यात तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था महत्त्वाची मानली जात आहे.

प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी जालना जिल्ह्यात १०२ एजंटांची नियुक्त्ती करण्यात आली आहे. प्रवाशांना हे एनसीएमसी स्मार्ट कार्ड १९९ रुपये शुल्कात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रवाशांनी गर्दी टाळून त्वरित स्मार्ट कार्ड घेऊन जावे : मनीषा सपकाळ ज्या प्रवाशांना एसटी महामंडळाकडून सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा मिळते, त्यांनी कोणताही विलंब न करता ३१ ऑगस्टपूर्वी एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढून घ्यावे. मुदतीनंतर स्मार्ट कार्ड नसलेल्या प्रवाशांना सवलत मिळणार नाही. त्यामुळे प्रवाशांनी शेवटच्या क्षणाची गर्दी टाळून तत्काळ कार्ड घेऊन घ्यावे.
- मनीषा सपकाळ, अध्यक्ष, विभाग नियंत्रक, जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT