Jalna News : महापालिकेकडून १७२ मालमत्ताधारकांना नोटीस File Photo
जालना

Jalna News : महापालिकेकडून १७२ मालमत्ताधारकांना नोटीस

कर वसुलीचे आव्हान, शासकीय कार्यालयांकडे १३ कोटींची थकबाकी

पुढारी वृत्तसेवा

Municipal Corporation issues notice to 172 property owners

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली मोहिमेला वेग आला असून थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मनपा प्रशासनाने तब्बल १७२ मालमत्ताधारकांना जप्तीची नोटीस बजावली असून कर न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याचा इशारा दिला आहे. शहरातील विविध शासकीय कार्यालयांकडेही सुमारे १३ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.

महानगरपालिके कडील आकडेवारीनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, कृषी व इतर विभागांच्या कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात कर बाकी आहे. चालू आर्थिक वर्षात सुमारे ९ कोटी ३ लाख ५७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली असून वसुलीचे प्रमाण ८.९१ टक्के इतके आहे. थकबाकी वसुलीसाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

वेळेत कर न भरल्यास संबंधितांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कर वसुलीबाबत शासकीय कार्यालयांना मागणीपत्रे देण्यात आली असून लवकरात लवकर थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहराच्या विकासकामांसाठी कर महसूल आवश्यक असल्याने सर्वांनी वेळेत कर भरावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे थकबाकीदारांना 66 नोटिसा देण्यात आल्या आहेत आणि कर वसुलीसाठी पुढील कारवाई सुरू आहे. कर थकवणाऱ्यांविरोधात नियमांनुसार पावले उचलली जात आहेत. तसेच शासकीय कार्यालयांकडे असलेल्या थकबाकीसाठीही मागणीपत्रे देण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा सुरू आहे. शहराच्या विकासासाठी कर महसूल आवश्यक असल्याने सर्वांनी वेळेत कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-राहुल देशमुख, कर विभागप्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT