Jalna News : बुरशी लागल्याने मोसंबी फळगळती वाढली  File Photo
जालना

Jalna News : बुरशी लागल्याने मोसंबी फळगळती वाढली

पन्नास टक्क्यांपर्यंत माल खराब, फळ बागायतदार चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

Mosambi fruit drop due to fungus

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा या वर्षीही मोसंबी बागातदाराला सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीच्या मुळे फटका बसला आहे. अतिवृष्टीच्या पावसामुळे मोसंबीला बुरशी लागून मोसंबीच्या फळांचा झाडाखाली पडून खच झाला झालेले आहे. यात जवळपास चाळीस ते पन्नास टक्के माल गळून पडलेला आहे. यामुळे फळबागायतदार शेतकरी चिंतेत आहे.

मराठवाड्यातील जिल्हा हा मोसंबीफळ भागासाठी प्रसिद्ध आहे. त्यातच जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोसंबीच्या फळबागा आहे. परंतु यंदा मोसंबी बागायतदार फळगळतीने संकटात सापडलेला आहे. जवळपास ४० ते ५० टक्के माल हा खाली गळून पडलेला आहे. काही भागांत अक्षरशः मोसंबी बागा खाली झालेल्या आहे. सध्या मोसंबीला आंब्या बहारचा माल आहे. ह्या बहरचा माल जवळपास शेतकरी दिवाळीपर्यंत ठेवतात. परंतु सध्या अशी परिस्थिती आहे की मोसंबी तोडणीला येण्याअगोदरच पिवळी पडून खाली पडत आहे. मार्केटलाही सध्या शेतकऱ्यांना हवा तसा भाव मिळत नाही. मोसंबी ही मार्केटला कवडीमोल भावाने विकल्या जात आहे. मोसंबी बागावर लावलेला खर्चदेखील वसूल होणार नाही असे चित्र सध्या दिसून येत आहे.

मोसंबीच्या मिरग्या बहारावर मुंगू रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोसंबी अक्षरशः बांधावर तोडून फेकावी लागली होती. शेतकऱ्यांच्या मागे नेहमीच संकटाची मालिका सुरू असते कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांनी होतं नव्हतं ते सर्व खर्च बागेवर केले.

मोसंबी फळगळतीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. 66 मोसंबी कर मोसंबीवर मागे मगरी रोगांच्या आक्रमण झाल्यामुळे उत्पन्नात घट झाली होती. आता अशातच फळगळतीनेही आमची चिंता वाढवलेली आहे.
-वैभव कोरडे, शेतकरी
मोसंबी फळगळतीमुळे आम्हाला खूप नुकसान झाले आहे. आमचा उत्पादनं खर्च वाढला आहे. आणि त्याचबरोबर आमचे उत्पादनही घटले आहे. मोसंबीचा भाव घसरल्याने आम्हाला फार तर काही पैसे मिळत आहे. पण ते आमच्या खर्चाच्या बरोबरी करण्यासाठी पुरेशी नाही.
-रामेश्वर पाचकुले, मोसंबी बागायतदार
आम्ही अनेक वर्ष मुला-बाळाप्रमाणे मोसंबीची संभाळ केली आहे. पण आता मोसंबीचा भाव घसरल्याने आणि रोगांच्या आक्रमणामुळे आम्हाला दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच आम्हाला सरकारकडून योग्य मदत मिळाली पाहिजे. जेणेकरून आम्ही आमची शेती करणे सोयीचे होईल.
-प्रशांत घाडगे, मोसंबी बागायतदार
आम्ही अनेक वर्ष मुला-बाळाप्रमाणे मोसंबीची संभाळ केली आहे. पण आता मोसंबीचा भाव घसरल्याने आणि रोगांच्या आक्रमणामुळे आम्हाला दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. अशातच आम्हाला सरकारकडून योग्य मदत मिळाली पाहिजे. जेणेकरून आम्ही आमची शेती करणे सोयीचे होईल.
-प्रशांत घाडगे, मोसंबी बागायतदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT