MLA Khotkar : शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवा file photo
जालना

MLA Khotkar : शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवा

आमदार खोतकर : वीजपुरवठ्याबाबत व्यक्त केली तीव्र नाराजी

पुढारी वृत्तसेवा

MLA Khotkar: Keep the power supply in the city smooth

जालना, पुढारी वृत्तसेवा : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले असताना वीज पुरवठा खंडित होत आहे. हा प्रकार चीड आणणारा असून, शहरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवा, अशा सूचना आमदार अर्जुन खोतकर यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

कन्हैय्या नगर येथील सर्कल कार्यालयात महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. आमदार खोतकर यांनी अधीक्षक अभियंता सरक तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर नागरिकांच्या समस्या मांडल्या. या बैठकीला जि.प. माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, मनपा विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेवक दीपक राठोड, नगरसेवक निखिल पगारे, नगरसेवक किशोर पांगारकर, नगरसेवक अमोल ठाकूर, नगरसेवक दिनेश भगत, नगरसेवक दुर्गेश कठोटीवाले, सचिन गुलाने, महावितरण विभागातील प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

वयोवृद्ध, लहान मुलांना नाहक त्रास

सध्या उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वयोवृद्ध, लहान मुले यांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होणे हे अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे येत्या काळात वीज पुरवठा नियमित करावा, अशा सूचना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT