sugarcane harvesting worker : ६३४ ऊसतोड कामगार कुटुंबांचे स्थलांतर थांबले  File Photo
जालना

sugarcane harvesting worker : ६३४ ऊसतोड कामगार कुटुंबांचे स्थलांतर थांबले

शाश्वत उपजीविकेसाठी शेळी पालन, किराणा दुकानाची मदत

पुढारी वृत्तसेवा

Migration of 634 sugarcane harvesting worker families stopped

जालना, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील बहुतांश गावांतील उसतोड कामगार सोलापूर सह इतर राज्यात उसतोडीसाठी जातात. यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणासह आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. या समस्यांचा निपटारा आणि स्थलांतर थांबवण्याचे आव्हान ग्राम प्रशासनासमोर उभे होते. अखेर उसतोड कामगारांना मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन दिल्यामुळे गेल्या वर्षभरापासुन सुमारे ६३४ कुटुंबांचे स्थलांतर थाबविण्यात यश आले आहे.

हाताला काम नसल्यामुळे जालना जिल्हातील परतूर १५ आणि घनसावंगी तालुक्यातील १५ अशा एकूण ३० गावातील उसतोड कामगार आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दरवर्षी कर्नाटक, सोलापूर, सातारा, बारामती आदींसह इतर ठिकाणी उसतोडीसाठी जातात. सोबत लेकरबाळ असतात. यामुळे या मुलांच्या आरोग्य पोषण व शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. या बालकांसह उसतोड कामगारांचे आरोग्य चांगले राहावे, यासह उपजीविकेची सोय व्हावी म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या वातीने प्रयत्न केल्या जात आहे.

उसतोड कामगार आरोग्य व पोषण खात्रीशीर सेवा प्रकल्पाच्या मध्यामातून उसतोड कामगारांसाठी पर्यायी उपजीविकेचे अनेक मार्ग त्यांनी उपलब्ध करुन दिले. पशुपालन, शेळी पालन, कोंबडी पालन, किराणा स्टोअर्स वाटप आदी उपजीविकेचे साधनं उपलब्ध करुन देण्यात आले. शेतात फळबाग, कैशल्य अधारित कामे बांधकाम, इलेक्ट्रिक, लघु उद्योग आदींची सुरूवात करणे या सारख्या पर्यायाचा वापर करण्यात आला. बुधवारी पांडेपोखरी सत्यभामा लोखंडे आणि क्रांती नगर येथील सविता बाळ पराडे उसतोड कामगारांना किराणा दुकानाचे वाटप करण्यात आले. यावेळी संपत मांडवे, समन्वयक पश्चिम विभाग अप्पासाहेब उगले, प्रकल्प संचालक अश्वजित जाधव, प्रकल्प व्यवस्थापक अनुप मोरे, जिल्हा समन्वयक एकनाथ राउत, सरपंच राजेभाउ जगताप, ग्रामविकास गणेशराव जगताप, अधिकारी व्ही. एस. ठोके आर्दीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

लघु उद्योग उभारावे उसतोड कामगारांनी गाव पातळीवर आपला स्वताःचा लघु उद्योग उभारावा. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था त्यांना कैशल्य विकास, आरोग्य व पोषण बाबत सहकार्य करेल.
अप्पासाहेब उगले, प्रकल्प संचालक
मी पांडेपोखरी येथील रहिवाशी आहे. उसतोड कामगार म्हणून आमचे कुटुंब काम करते. यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करावे लागते. मात्र, आता किराणा दुकानासाठी मदत झाल्याने स्थलांतर थांबेल.
- सत्यभामा लोखंडे, लाभार्थी, पांडेपोखरी.

सरपंचांच्या माध्यमातून लाभार्थीची निवड

गाव पातळीवर उसतोड कामगार समिती व गाव बाल संरक्षण समिती यांच्या माध्यमातून सरपंच हे लाभार्थ्यांची निवड करतात. गाव पातळीवर उसतोड कामगार समिती ठराव घेऊन निवड करण्यात येते. त्यांना शेळी पालन, कुक्कुट पालन, किराणा दुकानासाठी मदत केली जाते. उसतोड कामगारांना लघु उद्योग उभारुन त्यांच्या प्रशिक्षणाची सोय करुन दिल्या जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT