Maratha Reservation : २९ ऑगस्टच्या आंदोलनावर जरांगे ठाम file photo
जालना

Maratha Reservation : २९ ऑगस्टच्या आंदोलनावर जरांगे ठाम

मराठा समाजाचे आरक्षण व अन्य विषयावर २९ ऑगस्ट रोजी आंदोलनावर ठाम असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे अभ्यासकांच्या बैठकीत सांगितले.

पुढारी वृत्तसेवा

Maratha Reservation: Jarange firm on August 29 agitation

जालना, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाचे आरक्षण व अन्य विषयावर २९ ऑगस्ट रोजी आंदोलनावर ठाम असल्याचे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे अभ्यासकांच्या बैठकीत सांगितले. या बैठकीत गावपातळीवरील समित्यांना संवैधानिक अधिकार देऊन त्यांनी केलेल्या शिफारशी मान्य कराव्यात, अशी भूमिका मांडण्यात आली.

मराठवाडधात ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत, त्यांच्या नोंदी शोधण्यात याव्यात, अशी मागणी अभ्यासकांनी केली. सध्याच्या शासन निर्णयामुळे ज्यांच्या नौदी उपलब्ध नाहीत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नसल्याने त्यात बदल करण्याची गरज असल्याचे जरांगे म्हणाले, तसेच वैधता कायद्यात सुधारणा करण्याची मागणी करताना २००१ आणि २०१२ ध्या कायद्यातही बदल आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी व संख्येच्या आधारे मराठवाड्यातील पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, यावर अभ्यासकांचे एकमत झाल्याचे जरांगे यांनी सांगितले, तसेच सातारा, कोल्हापूर, पुणे आणि बॉम्बे गॅझेटियरच्या आधारे शासन निर्णय कसा काढता येईल, यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

मी ५८ लाख नॉर्दींचे प्रमाणपत्र घेणार आहे. या नोंदी भी शोधलेल्या नाहीत, सरकारने शोधल्या आहेत. ज्यांचे प्रमाणपत्र निघाले आहे, त्यांना वैधता मिळाली पाहिजे, असे जरांगे यांनी सांगितले.

आंदोलन स्थळाबाबत अनिश्चिती

२९ ऑगस्टला आपण आंदोलन कुठे करणार हे आत्ताच सांगता येणार नाही, मी कुठेही बसून आरक्षण मिळवून देईन. पण सुत्रांच्या माहितीनुसार जरांगे यांचे आंदोलन मुंबईत आंदोलन होऊ शकते. आम्ही मुंबईला का नाही जायचं? देवेंद्र फडणवीस आमचे नाहीत, वर्षा आमची नाही का? आंदोलन शांततामय मागनिच केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT