Maratha protesters blocked the road twice on the national highway
वडिगोद्री, पुढारी वृत्तसेवा धुळे सोलापूर महामार्गावर मराठा समाजाने रविवारी दोन वेळा रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
हलगीच्या तालावर नृत्य, लेझीम खेळत, फुगडी खेळत आंदोलन करण्यात आले. जरांगे यांनी शनिवारपासून पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. वडीगोद्रीच्या उड्डाणपुलावर रस्ता रोको करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांची सरकार विरोधात घोषणाबाजी केली. सरकारने तातडीने मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. सरकारचे दुर्लक्ष कायम राहिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनाच्यावेळी मराठा समन्वयकांनी मध्यस्थी करत रास्ता रोको मागे घेण्यास भाग पाडले.