मंठा ः अवैध आरोपीस जेरबंद केल्यानंतर आरोपीसह मंठा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी  (छाया ः बालाजी कुलकर्णी)
जालना

Illegal Gutkha Seized : मंठा पोलिसांची अवैध गुटखा, दारूवर कारवाई

तिघा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

मंठा ः मंठा पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. शहरात दोन ठिकाणी कारवाई करत अवैध गुटखा व विदेशी दारू जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित गुटखा अवैधरित्या मंठा चौफुलीवरील एका टपरीमध्ये चोरी छुप्या विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी अहमदपूर येथील गौस अहमद कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंठा-ऊस्वद रोडवरील उमरखेडा येथे विनापरवाना विदेशी दारू बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले.

या कारवाईत ऋषिकेश विष्णू वाघमारे व कृष्णा सुदाम बोराडे यांच्या ताब्यातून 81 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी दोन जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

यांनी केली कारवाई

सदरची कारवाई पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक नीलेश विधाटे, फौजदार संतोष माळगे, पोलिस कर्मचारी आनंद ढवळे, कानबा हाराळ, सज्जन काकडे, जायभाय, संतोष बनकर आणि आसाराम मदने यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT