५० टक्क्यांच्या आत मराठा आरक्षण द्या. अशी मनोज जरांगे यांनी मागणी केली. ( संग्रहित छायाचित्र )
जालना

Maratha Reservation | आधी ५० टक्क्यांच्या आत मराठा आरक्षण द्या : मनोज जरांगे

पुढारी वृत्तसेवा

वडीगोत्री : शरद पवार यांची मागणी चांगली आहे ज्यावेळी गरज होती त्यावेळी ही मागणी माण्य केली नाही. आम्हाला हे मान्य नाही. आम्हाला आधी ५० टक्यांच्या आत घेऊन आमच्या संख्येनुसार आरक्षण द्या.

मनोज जरांगे यांचा शरद पवार यांना टोला

मराठ्यांना सत्ताधारी विरोधकांनी फसवू नये. बहाणे करू नका, निवडणुकीच्या तोंडावर कशीही वकव्य करू नका, असा टोला मनोज जरांगे यांनी शरद पवार यांना लगावला. ते शुक्रवारी अंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साथत होते. शरद पवार यांनी आरक्षण मर्यादा वाढविण्याची मागणी केली असून यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली.

आम्हाला वेड्यात काढू नका. निवडणूक लागायच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, त्यांनतर मर्यादा वाढवा. हे प्युअर नाटक आहे, मर्यादा वाढवा त्यास आमचा विरोध नाही, पण निवडणूक लागण्याआधी ओबीसीतून आरक्षण द्या.

फडणवीसांना त्यांचे गणित विस्कटून जाण्याची भीती

सताधारी आणि विरोधकांची भूमिका एकच आहे.दोघांनीही या पाच वर्षात अडीच वर्षे सत्ता भोगली. म्हणून तर आम्हाला एवढे वर्षे लागले ७०-७५ वर्षांत एवढी चटणी आमच्या डोळ्यात कुणी फेकली नाही, असे ते म्हणाले, गुलालाचा अवमान होऊ देऊ नका, असे मी मुख्यमंत्र्यांना वाशीममध्ये म्हणालो होती.

फडणवीस आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत, असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला. फडणवीस चतुर आहेत. त्यांना लोकसभेत झटका बसलाय त्यांमुळे त्यांचे गणित विस्कटून जाण्याची भीती त्यांना आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT