मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे  Pudhari News Network
जालना

Manoj Jarange | महाराजांचे पुतळे उभारून इतर जातींना मराठा समाजाच्या अंगावर घालण्याचा डाव : जरांगे

अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे जरांगे यांनी माध्यमांशी साधला संवाद

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री ः छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारून राज्यातील मराठा समाजाच्या अंगावर इतर जातींना घालण्याचा डाव सुरु असल्याचा संशय मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथे जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.यावेळी पुढे बोलतांना जरांगे म्हणाले कि, पुतळे उभारतं कोण? विकतो कोण यांची माहिती घेऊन त्याचा शोध घेणार आहे.शिवाजी महाराजांचे पुतळे उभे केल्यानंतर बाजूला माझा फोटो लावून बदनामीचे षडयंत्र केले जात आहे.

कुठेही शिवाजी महाराजांचे पुतळे न उभारता अधिकृत जागेवरच पुतळे उभारा असे अवाहनही मनोज जरांगे यांनी यावेळी केले.यावेळी जैन मुनींनी वादग्रस्त वक्तव्य करु नये असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारून राज्यातील मराठा समाजाच्या अंगावर इतर जातींना घालण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT