मनोज जरांगे यांना गोळ्या घालण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल file photo
जालना

मनोज जरांगे यांना गोळ्या घालण्याची धमकी; ऑडिओ क्लिप व्हायरल

धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांच्या नावांचा उल्लेख

पुढारी वृत्तसेवा

Manoj Jarange receives death threats; audio clip goes viral

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा :

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांना जिवे मारण्याची धमकी देणारी एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

या क्लिपमध्ये जरांगे यांना चक्क गोळ्या घालून ठार मारण्याची भाषा वापरण्यात आली आहे. हे संभाषण मनोज जरांगे समर्थक आणि वाल्मीक कराड समर्थक यांच्यात झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

व्हायरल होत असलेल्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती जरांगे समर्थकांशी अरेरावीने बोलताना ऐकू येते. यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि आ. धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन धमकावण्यात आले आहे.

समोरच्या व्यक्तीने जरांगे समर्थकाला सुनावताना, मनोज जरांगे यांना मी स्वतः गोळ्या घालीन, अशी धमकी दिली आहे. तसेच पुन्हा धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे नाव घ्यायचे नाही, अन्यथा तुलाही जिवे मारू, असा सज्जड दमही भरला आहे.

जिल्ह्यात संतापाचे वातावरण

या क्लिपमध्ये धमकी देणारी व्यक्ती आणि ज्याला धमकी दिली गेली, त्या दोघांचीही ओळख अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही. मात्र मराठा आंदोलकाच्या जीवाला धोका निर्माण करणारी ही क्लिप व्हायरल झाल्याने समाजमाध्यमांवर आणि जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT