जालना

…तर लोकसभेपेक्षा दहापट जास्त फटका विधानसभेला बसेल; जरांगेंचा सरकारला इशारा

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सरकारने याआधी मराठा आंदोलनाकडे १७ दिवस दुर्लक्ष केले होते. आता देखील लोकसभेला फटका बसल्याने ते असं करत असतील तर यापेक्षा दहापट जास्त फटका विधानसभेला बसेल. आमजी मजा बघणार असालं तर विधानसभेलासुद्धा आऊट करणार, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.

राज्यात मराठ्यांशिवाय पानं हालत नाही. मराठांच्‍या एकीचा सर्वांनी धसका घेतला आहे. आम्ही फक्त त्यांना सावध करत आहे. आम्हाला राजकारणात यायचं नाही, फक्त आमच्या समाजाची मुलं मोठी करायची आहेत, असेही जरांगे पाटील यांनी आज (दि. १२) माध्यमांशी बोलताना सांगितले.

अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आम्‍ही केलेल्‍या मागण्‍या मान्‍य होईपर्यंत माझे बेमुदत उपोषण सुरुच राहील. सरकारसाठी आमची दारे उघडी आहेत. आमच्या मागण्यांची दखल घ्यावी एवढीच आमची मागणी आहे. एका मंत्र्यांनी आरक्षणाचा प्रश्न तडीस नेतो, असं अश्वासन दिलं. म्हणून काल रात्री सलाईन लावून घेतलं आहे. हा विषय तडीस नेल्यास त्यांच नाव जाहीरपणे सांगतो. आज संध्याकाळ पर्यंत कळेल नाहीतर पुन्हा सलाईन काढून फेकणार, असेही ते म्हणाले. मराठा बांधावांनी अंतरवालीत गर्दी करु नये, असे आवाहनही त्‍यांनी केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT