Manoj Jarange Patil Mumbai Agitation 
जालना

Manoj Jarange Patil : "१२ सप्टेंबरपर्यंत मुंबईत या: : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना दिला 'गनिमी काव्या'चा प्लॅन

बेमुदत उपोषण सोडणार नाही, मुंबईला जाणारच असल्याचा पुनरुच्चार

पुढारी वृत्तसेवा

Manoj Jarange Patil Mumbai Agitation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत 'लढाई'ची तयारी सुरू केली आहे. "मी उपोषण सोडणार नाही आणि मुंबईला जाणारच," असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी मराठा समाजबांधवांना १२ सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे आवाहन आज (दि. ३१ ऑगस्ट) माध्यमांशी बोलताना केले.

नातेवाईकांकडे किंवा ओळखीच्या पाहुण्यांकडे मुक्काम करावा

६ व ७ सप्‍टेंबरनंतर मुंबईकडे निघा. पुढील 12 तारखेपर्यंत मुंबईत जमावे. आझाद मैदानात जाऊ नका, अन्यथा पोलिसांना मराठा मुंबईत यायला लागले आहेत, असा संशय येईल. मराठा समाजातील नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत १२ सप्टेंबरपर्यंत मुंबई गाठावी आणि तिथे आपल्या नातेवाईकांकडे किंवा ओळखीच्या पाहुण्यांकडे मुक्काम करावा, असेही जरांगे पाटील म्हणाले.

मी येतोय, निरोप मिळताच रस्त्यावर उतरा

"मी मुंबईत आलो आहे, असा निरोप मिळताच सर्व समाजबांधवांनी तातडीने रस्त्यावर उतरावे," असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले.

पोलिसांच्या कारवाईला घाबरू नका

आंदोलन कडक होण्याची शक्यता लक्षात घेता, "पोलिसांनी पकडून ठाण्यात नेले तरी मराठा बांधवांनी अजिबात घाबरू नये," असा धीर त्यांनी आंदोलकांना दिला. मुंबई आंदोलनाबाबत ठाम राहत त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, मागणी पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही.

सरकारबरोबर चर्चा नाही

आमची राज्‍य सरकारबरोबर चर्चा सुरु नाही. मंत्री विखे पाटील म्हणत असतील जरांगे पाटील यांच्याशी बोलणी सुरू आहेत तर ते दुसरे जरांगे पाटील असतील, असे स्‍पष्‍ट करत १२ सप्‍टेंबर रोजी आंदोलन केले जाणार नाही. मात्र १२ सप्‍टेंबरला मुंबईल केव्‍हा जायचे याबाबत निर्णय घेतला जाईल. सरकारची चर्चेसाठी रे खुली असतील ,पण आम्हला जायचं नाही त्यांच्याकडे. चर्चेसाठी आमची दारे ही खुली आहेत. असेही जरांगे पाटील यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

आमच्या इतके देव-देव कुणी करीत नाही

देवेंद्र फडणवीस, भाजपने सांगावे की, मराठ्यांच्‍या कुणबी म्‍हणून 58 लाख नोंदी सापडल्या नाहीत, मराठ्यांना एकनाथ शिंदे यांनी फसविले, अन्यथा एकनाथ शिंदे यांनी सांगाव की 58 लाख नोंदी आहेत. चारही रद्द झालेले जात प्रमाणपत्र शैक्षणिक देखील आहेत. ते प्रमाणपत्र रद्द होण्यासारखे न्हवते, रद्दच होत नसतील तर पुढे अपिलमध्ये आम्ही न्यायालयात का जायचे? , असा सवाल करत आम्‍ही आमच्‍याकडे ११ दिवसांचा गणपती बसवतो. आमच्या इतके देव देव कुणी करीत नाहीं, एक दीड दिवसाचा गणपती बसवणार आणि आम्हाला शिकवणार का?, असा टोलाही त्‍यांनी यावेळी लगावला.

... तेव्‍हाच आंदोलनावर तोडगा निघेल

संविधानात असेल म्हणूनच जीआर निघाला असेल. भ्रष्टाचारी लोकांना भाजपमध्ये घेतले तर ते साविधानिक आहे. तुम्ही कितीही हजार कोटीचा घोटाळा करा ते साविधानिक आणि जे खरे त्यांना जेल मध्ये टाका. सरकारने सगळ्या मागण्यांच्या अंमलबजावणी केल्यावर या आंदोलनावर तोडगा निघेल, असा पुन्‍नरुच्‍चारही त्‍यांनी केला.

... तर एकनाथ शिंदेंना पळायला देखील जागा मिळाली नसती

एकनाथ शिंदे संपला पाहिजे म्हणून मंत्री शिरसाठ यांनी गेम केला आहे, असा आरोप करत मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळे उतरती कळा येणार आहे मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदे यांची बराबरी करू शकले नाहीत. लाखांची सभा घेणाऱ्या शिंदेंना 5 हजार ची सभा घ्यावी लागली. त्‍यांची सभा होणार आहे हे मला उशिरा कळलं, मी जाण्याआधी 10 ते 12 लाख मराठे जमले असते, नाहीतर परभणी ते नांदेड पर्यंत एकनाथ शिंदे यांना पळायला देखील जागा मिळाली नसती. मी जर परभणीकडे एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी निघालो असतो, तर नांदेडच्या विमानतळाचे सर्व दरवाजे तोडून मराठे विमानतळात घुसले असते. तुम्ही सांगा सभा घेणार मग बघीतले असते, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिले.

जात पडताळणी समिती नकोच

जात पडताळणी समिती नकोच, अशी आम्‍ही मागणी केली आहे. मी फक्त मराठ्यासाठीच ही मागणी केलेली नाही. सर्वासाठी ही समिती नकोय म्हणतोय. मंत्री छगन भुजबळ यांनी धनगरांचे वाटोळे केले आहे. परीक्षेत ज्यांचे नुकसान झाले त्या मुलांनी भुजबळ जाब विचारले पाहिजे, असेही जरांगे पाटील म्‍हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT