Man arrested for buying and selling pistols
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यात गावठी पिस्तुलची खरेदी विक्री करणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिस पथकाने जेरबंद करीत सलग दुसऱ्या दिवशी कारवाईचा सिलसिला जारी ठेवला आहे.
अंबड व घनसावंगी येथे दाखल असलेल्या पिस्तुलच्या गुन्ह्यातील वॉटेड आरोपी समिर ऊर्फ उस्मान शौकत सय्यद (रा. पानेवाडी, ता घनसावंगी) हा गांधीनगर येथे त्याच्या मित्राकडे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी पानेवाडी येथून समिर ऊर्फ उस्मान शौकत सय्यद यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला खोवलेली एक गावठी पिस्टल व ५ जिवंत काडतुसे त्याच्याकडे मिळून आले.
पोलिसांनी त्यास सदरचे पिस्टल व जिवंत काडतुसे कोठून आणले याबाबत विचारणा केली असता त्याने त्याचा मित्र कुमार ऊर्फ राजकुमार भानुदास शिंदे (रा. गांधीनगर जालना) याच्याकडून पिस्तूल खरेदी केल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी कुमार ऊर्फ राजकुमार भानुदास शिंदे यास ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने काही दिवसांपूर्वी सदचे पिस्टल व जिवंत काडतुसे हे समिर ऊर्फ उस्मान शौकत सय्यद यास विक्री केले असल्याचे सांगितले. सदर आरोपितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उप विभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ यांनी केली.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पानेवाडी येथून समीर ऊर्फ उस्मान शौकत सय्यद यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला खोवलेली एक गावठी पिस्टल व ५ जिवंत काडतुसे त्याच्याकडे मिळून आले. पोलिसांनी त्यास सदरचे पिस्टल व जिवंत काडतुसे कोठून आणले या बाबत विचारणा केली असता त्याने त्याचा मित्र कुमार ऊर्फ राजकुमार भानुदास शिंदे (रा. गांधीनगर जालना) याच्याकडून पिस्तूल खरेदी केल्याचे सांगितले.