Making a khanger reel on Instagram got expensive
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील चंदनझिरा येथे खंजर बाळगून इंस्टागामवर रिल बनवून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना सोमवार दि. ८ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
आरोपी सचिन कैलास गायकवाड, (२१), रा.एकता चौक, चंदनझिरा व सचिन शिवाजी जाधव, (२५) रा. एकता चौक, चंदनझिरा जालना यांना इंद्रायणी हॉटेल परिसर, चंदनझिरा येथून ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून एका धारदार व तीक्ष्ण खंजर व इंस्टाग्राम व्हिडीओ बनविण्यासाठी व व्हायरल करण्यासाठी वापरलेला मोबाईल असा एकूण ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीनी दि. ४ रोजी चंदनझिरा येथे मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये धारदार व तीक्ष्ण खंजरसह नाचून त्याचा व्हिडीओ तयार करून तो इंस्टाग्रामवर पोस्ट करून जनतेमध्ये दहशत निर्माण केली. त्यामुळे दोन्हीही आरोपितांविरुध्द चंदनझिरा पोलिस ठाणे, जालना येथे सरकारतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि योगेश उबाळे, सपोनि. सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अमंलदार प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, संदीप चिंचाले, गणपत पवार यांनी केली.