Jalna News : मजुरांना गावातच तत्काळ कामे उपलब्ध करून द्या : जिल्हाधिकारी file photo
जालना

Jalna News : मजुरांना गावातच तत्काळ कामे उपलब्ध करून द्या : जिल्हाधिकारी

जलकवच अभियान प्रभावीपणे राबवा, दुष्काळी पार्श्वभूमीवर आढावा बैठकीत निर्देश

पुढारी वृत्तसेवा

Make work immediately available to laborers within the village itself: District Collector

जालना, पुढारी वृत्तसेवाः कामांचा 'शेल्फ ऑफ प्रोजेक्ट्स' तयार ठेवून जलसंधारण व मृदसंधारणाची जास्तीत जास्त कामे हाती घेऊन मजुरांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात व्ही.बी.जी.राम.जी संदर्भातील सर्व खातेप्रमुख आणि व्ही.बी.जी. राम जी अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कणवारिया, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनिषा दांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) सुरेश वडोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

'जालना जलकवच' अभियानांतर्गत जलतारा, शोषखड्डे, छतावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे, गाळ काढणे तसेच अन्य जलसंधारण व मृदसंधारणाची कामे प्राधान्याने सुरू करावीत, संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर योजनेअंतर्गत चारा लागवडीची कामे घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

विकसित ग्रामपंचायत प्लान' तयार करावा

ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ग्रामसभांमध्ये अनुज्ञेय ३७५ कामांची माहिती नागरिकांसमोर प्रदर्शित करून व्हीजीपीपी (विकसित ग्रामपंचायत प्लान) आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कामांना प्राधान्यक्रम ठरविताना महिला, भूमिहीन मजूर, अल्पभूधारक आणि संवेदनशील वस्त्यांतील नागरिकांचा सहभाग प्राधान्याने घ्यावा, असेही सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT