Mahavitaran cuts off electricity to 1,000 customers
जालना, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या परिमंडल कार्यालयाने महिनाभरात तिसऱ्यांदा छत्रपती संभाजीनगरहून अभियंते व तंत्रज्ञांची पथके पाठवली. या पथकांनी सोमवारी (८ सप्टेंबर) रोजी राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील तीन तालुक्यांत एक हजाराहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला. छत्रपती संभाजीनगरची पथकांनी जिल्ह्यात सातत्याने केलेल्या धडक कारवाईमुळे वीजबिल थकबाकीदार व वीजचोरांत खळबळ उडाली आहे.
जालना जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील सव्वा लाख ग्राहकांकडे वीजबिलांची १२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी महावितरणतर्फे विविध मोहिमा राबवण्यात येत आहेत. वीजबिल भरण्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी जालना जिल्ह्यात बीजबिल वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण मंडलातील शाखा अभियंते व तंत्रज्ञांची पथके पाठवण्यास सुरुवात केली आहे.
मागील महिन्यात १८ व २५ ऑगस्ट रोजी १६९ पथकांनी केलेल्या कारवाईत ३ हजार ५०० ग्राहकांनी पावणेतीन कोटी रुपयांची वीजबिले भरली होती. तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता व दीडशे ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता. मागील महिन्यात साडेसहा हजार ग्राहकांना या पथकांनी भेट दिली होती. त्यात दीडशेहून अधिक वीजच ौऱ्या पकडण्यात या पथकांना यश मिळाले होते.
मागील महिन्याप्रमाणेच सप्टेंबरमध्येही ही मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे, ोरी त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमधील अभियंता व तंत्रज्ञांची तब्बल ४५ पथके सोमवारी (८ सप्टेंबर) रोजी जालना शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत दाखल झाली.
अधीक्षक अभियंता संजय सरग, कार्यकारी अभियंता व्यंकटेश पेन्सलवार यांच्या नेतृत्वाखाली या पथकांसह स्थानिक अभियंते व कर्मचाऱ्यांनी जालना शहरातील जुना जालना, मस्तगड, शनिमंदिर रोड, अंबड चौफुली, भाग्यनगर, सराफा बाजार, बडी सडक, सदर बाजार, मंठा चौफुली, कन्हैय्यानगर, चंदनझिरा, मोतीबाग, संजयनगर, दुःखौनगर, शंकरनगर यासह तालुक्यातील इंदेवाडी, मानदेऊळगाव, चौधरीनगर तसेच भोकरदन व जाफराबाद शहरात वीजबिल वसूल करण्यासह वीजच-पकडण्याची धडक मोहीम राबवली.
महावितरण पथकांनी दिवसभरात १९८१ ग्राहकांची तपासणी केली. त्यात ८६० ग्राहकांनी त्यांच्याकडील वीजबिलाचे ८६ लाख रुपये भरून वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळली, तर १ हजार २७ ग्राहकांनी वीजबिल भरण्यास टाळाटाळ केली. त्यांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. ९४ ग्राहकांचा बीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला.