Local Crime Branch seizes gutkha worth Rs 1.68 lakh
जालना, पुढारी वृत्तसेवा : मानवी आरोग्यास घातक व प्रतिबंधीत गुटखा स्कुटीवरुन वाहतुक करतांना एका जणास पोलिसांनी पकडले. या व्यक्तीच्या ताब्यातुन १लाख ६८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जालना जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतुक व विक्री करणारे संबंधी माहिती घेऊन कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करुन कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. त्या नवीन मोंढा परिसरात मोहम्मद ताबिश अब्दुल खालेद मोमीन (रा. बागवान मोहल्ला, जुना जालना) हा स्कुटीवरुन प्रतिबंधीत गुटखा घेवुन जात असतांना पोलिसांनी त्यास पकडले.
यावेळी स्कुटीवरील गोण्या पोलिसांनी तपासल्या असता २० गोण्या विमल पान मसाला व तंबाखु गुटखा मिळुन आला. आरोपी ताबिश अब्दुल खालेद मोमीन यांच्या ताब्यातुन पोलिसांनी १ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. आरोपीविरुध्द सरकारतर्फ फिर्यादीवरुन चंदनझिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बसंल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक, योगेश उबाळे, सचिन खामगळ, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ, रमेश राठोड, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, अशोक जाधवर, महिला अंमलदार रेणुका बांडे, अरुणा गायकवाड यांनी केली आहे.