वीज कोसळून पशुधन दगावले ; शेतकरी हतबल, मदतीची मागणी file photo
जालना

वीज कोसळून पशुधन दगावले ; शेतकरी हतबल, मदतीची मागणी

चौरीवाडी परिसरातील घटना; ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी केला पंचनामा

पुढारी वृत्तसेवा

Livestock killed by lightning; Farmers Left Helpless, Seek Aid

पारध, पुढारी वृत्तसेवा भोकरदन तालुक्यातील पारध रामनगर (चौरीवाडी) परिसरात सोमवार, दि. ३० रोजी सायंकाळच्या सुमारास वीज पडून एक शेतकऱ्याचा बैल दगावला आहे.

यामुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. माहितीनुसार, गट क्रमांक २०८ मधील शेतात बैल बांधून ठेवला होता. सोमवारी सायंकाळी अचानक आभाळ भरुन आले. वादळीवाऱ्यासह सुरू झालेल्या पावसात अचानक बैलावर वीज को सळली. या घटनेत बैलाचा जागीच मृत्यू झाला.

वीज दुघटनेत दगावलेला बैल पारध येथील शेतकरी तुषार फकीरा भुते यांचा होता. या शेतकऱ्याच्या शेतीकामासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. बैलाच्या मृत्यूमुळे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच तलाठी चेतन राजपूत यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. प्राथमिक अहवालात वीज पडल्यामुळेच बैलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असून पुढील अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या सततच्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले असून शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

मदतीची अपेक्षा 66 माझ्यासाठी हा बैल फक्त जनावर नव्हता, तर कुटुंबातील सदस्यासारखा होता. त्याच्यावरच शेतीची सगळी कामे अवलंबून होती. एका क्षणात वीज कोसळली आणि सगळे संपले. आता शेती कशी करायची असा प्रश्न पडला आहे.
तुषार भुते (शेतकरी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT