Leopard News : सुखापुरी मंडळात बिबट्या अवतरला  File Photo
जालना

Leopard News : सुखापुरी मंडळात बिबट्या अवतरला

शेतकरी, ऊसतोड कामगारांनी काळजी घ्यावी : जिल्हाधिकारी

पुढारी वृत्तसेवा

Leopard movement in Sukhapuri mandal of Ambad taluka of the district

जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापूरी मंडळात बिबट्याचा वावर असल्याचे वन विभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी जावुन पाहणी केली. यावेळी बिबट्या असल्याचे निदर्शनास आले असुन जिल्ह्यातील शेतकरी व ऊसतोड मजुरांनी शेतातील कामे करतांना सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

अंबड तालुक्यातील सुखापुरी मंडळात मंगळवार (११) रोजी पिठोरी सिरसगाव शिवारात शेतकऱ्यांना बिबट्या हा वन्य प्राणी दिसला असल्याच्या माहितीवरुन वनविभागाच्या रेस्क्यू टीमने तेथे जावुन पाहणी केली. या पाहणी दरम्यान बिबटचा या परिसरात वावर असल्याचे दिसून आले.

वन विभागाकडून जनजागृती व अवाहन

उंदीर, पक्षी, सरपटणारे प्राणी, डुकरे आणि कुत्रे हे बिबट्याचे खाद्य आहे. प्रत्येक बिबट्याला पोकळ ठिपक्यांची विशिष्ट रचना असते. त्यामुळे गावाजवळीत शेतात बिबट्या आल्यास त्याला बघण्यासाठी गर्दी करू नये, दगड मारुन त्याला पळविण्याचा प्रयत्न करू नये, पहाटे व सायंकाळी अंधारात गावाबाहेर व शेतात जाण्याचे काही काळ टाळावे, बिबटया दिसताच जवळच्या वनरक्षक व चौकीदाराला कॉल करुन माहिती द्यावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT