Leopard Attack : बिबट्याने पाडला २५ जनावरांचा फडशा File Photo
जालना

बिबट्याने पाडला गायीचा फडशा

रुई येथे वीस दिवसांतील दुसरी घटना; भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Leopard kills cow at jalna

सुखापुरी, पुढारी वृत्तसेवाः अंबड तालुक्यातील रुई परिसरात बिबट्याची दहशत वाढल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी पंढरीनाथ प्रभाकर राजगुरू यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची घटना घडली. गेल्या वीस दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे.

रुई येथे गोठ्यात बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. यावेळी कालवडीने मोठा आवाज केल्याने राजगुरू कुटुंबीयांनी शेतात धाव घेतली. यावेळी त्यांना कालवडीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. कालवडीच्या मानेला आणि अंगावर खोल जखमा दिसून आल्याने हा विवट्याचाच हल्ला असल्याचे स्पष्ट झाले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी वनपाल बी. एम. पाटील, वनरक्षक कैलास कदम. वनसेवक शेषराव राठोड. संतोष राठोड. पशुवैद्यकीय अधिकारी सिद्दीकी यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून कालवडीच्या मृतदेहाची पाहणी केली. वीस दिवसांपूर्वी गावाच्या दुसऱ्या भागात बिबट्याने गायीवर हल्ला केला होता. त्यानंतर वनविभागाने गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र पुन्हा हल्ला झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व भीतीचे वातावरण आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की रुई परिसरात पिंजरा लावण्याची तयारी सुरू असून, बिबट्याचा शोध घेण्यासाठी पथक नियुक्त केले जाणार आहे. अंबड तालुक्यात सध्या ऊस तोडणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने विवट्या आणि बिबट्यासदृश प्राणी पूर्वी लपून बसत असलेल्या उसाच्या शेतातून बाहेर येत आहेत. त्यांची लपण्यासाठी जागा कमी झाल्याने हे प्राणी बाहेर येत आहेत.

सतर्क रहा

वनविभागाने शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. शेतात एकटे जाणे टाळावे, शेतात जाताना आवाज करावा, घुंगराची काठी वापरावी, वाकून काम करू नये तसेच नेहमी दक्ष राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. "ग्रामस्थांनी काळजी घेतली तर अनर्थ टाळता येऊ शकतो," असेही विभागाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT