Maratha Reservation Movement
अशोक चव्हाण Pudhari File Photo
जालना

मराठा आरक्षण आंदोलन | गंभीर गुन्हे मागे घेण्यात कायदेशीर अडचणी : खासदार अशोक चव्हाण स्पष्टच बोलले

पुढारी वृत्तसेवा

जालना : मराठा आरक्षण समितीचे माजी अध्यक्ष तथा भाजपा खासदार अशोक चव्हाण व छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भूमरे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत.

या तिघांची भेट मनोज जरांगे पाटील वास्तव्यास असलेल्या सरपंचांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. याच्यातील भेटी या तिघांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण यांनी कोणाला तरी फोनवरून बोलणे झाले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचे ही त्याच मोबाईलवरून बोलणे अशोक चव्हान यांनी करून दिले. त्या तिघांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे.

अशोक चव्हाण आणि संदिपान भुमरे जरांगेंच्या भेटीला अचानक आल्यामुळे चर्चांना उधान..

खासदार अशोक चव्हाण आणि खासदार संदिपान भुमरे मनोज जरांगे पाटलांचे भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील वास्तव्यास असलेल्या सरपंचांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. दरम्यान या तिघांमध्ये काय चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की, किरकोळ गुन्हे मागे घेण्यात अडचणी नाही पण गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यात न्यायालयीन अडचण येत आहे. मी मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा करण्याची जबाबदारी घेतली आहे. यापुढेही पाठपुरावा करत राहणार असे ते म्हणाले. जरांगे पाटीलांची हैद्राबाद गॅझेट आणि सातारा संस्थानचं गॅझेट सरकारने स्वीकारण्याची मागणी केली आहे.

जरांगे पाटील म्हणाले, सातारा संस्थानचं गॅझेट, हैद्राबाद गॅझेट स्वीकारणे बाबत तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्याची मागणी केली आहे. जरांगे पाटलांनी सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्येनुसार करण्याची मागणी केली आहे. या बैठकीनंतर जंरागे म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही. या बैठकांमुळे माझं समाधान झालं असं नाही.

मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार अशोक चव्हाण म्हणाले की,लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी देखील मी जरांगे यांची भेट घेतली होती.मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्याचे पाठपुरावा करण्याची मी जबाबदारी स्वीकारली असल्याचे आश्वासन खासदार अशोक चव्हाण यांनी दिले. फोनवर मंत्री शंभु राजे देसाई आणि जरांगे यांचे बोलणे झाले आहे. जेवढ्या लवकर हा विषय संपेल तेवढे चांगला आहे, शासन स्तरावर आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत. मराठा समाजाचे प्रश्न लवकर मार्गी लागले पाहिजे या साठी मी प्रयत्न करीत आहे.आजची भेट कुठलीही राजकीय नव्हती. मी मुख्यमंत्र्यांना भेटून या सर्व मागण्या संदर्भात पाठपुरावा करणार आहे.शासन आणि जरांगे मध्ये मी समन्वयाची भूमिका करत आहे..

SCROLL FOR NEXT