Vegetables Pudhari
जालना

Agricultural Produce Market Committee : आले १७ हजार, लसणाला १२ हजारांचा भाव

जालना बाजार समितीत बटाटा, कांदा, हिरवी मिरची व कोथिंबिरीची मोठी आवक

पुढारी वृत्तसेवा

जालना, पुढारी वृत्तसेवा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शनिवारी (दि. ११) झालेल्या भाजीपाला व फळांच्या लिलावात आले आणि लसूण या पिकांना अनुक्रमे प्रतिक्विंटल १७ हजार व १२ हजार रुपयांचा कमाल भाव मिळाला. तर बटाटा, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मेथीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने बाजारात चांगली उलाढाल झाली.

बाजारात बटाट्याची ८९.७ क्विंटल, कांद्याची ४९.७ क्विंटल, हिख्या मिरचीची १५.२ क्विंटल, मिरची (काकडी) १०.२ क्विंटल, टोमॅटो १३.४ क्विंटल, लसूण ११.८ क्विंटल, आले १२.२ क्विंटलआणि मक्याची १६.२ क्विंटल आवक झाली.

फळबाजारात आवळ्याची सर्वाधिक २९१ कॅरेट आवक झाली. डाळिंबाला प्रतिकॅरेट ३,५०० रुपये, सफरचंदाला ३,८०० रुपये, इम्पोर्टेड ड्रॅगन फ्रूटला २,६०० रुपये, जांभळाला १,६०० रुपये, तर संत्र्याला १,००० रुपये कमाल भाव मिळाला.

भाजीपाल्यात हिरवी मिरची, शेंगा, भेंडी, गवार, दोडका आणि कारले या पिकांना चांगला दर मिळाला. तर कांद्याचा सरासरी भाव १,६०० रुपये, बटाट्याचा ७०० रुपये, लसणाचा ५,५०० रुपये, आलेचा ७,५०० रुपये आणि टोमॅटोचा १,५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT