Ladki Bahin Yojana : जिल्ह्यात ८४ हजार ४१६ महिलांचे अनुदान बंद ! file photo
जालना

Ladki Bahin Yojana : जिल्ह्यात ८४ हजार ४१६ महिलांचे अनुदान बंद !

लाडकी बहीण' योजना : ४ लाख २७८ महिलांना लाभ; शासनाचा दरमहा वाचणार १२.६६ कोटींचा खर्च

पुढारी वृत्तसेवा

Ladki Bahin Yojana: Subsidy stopped for 84,416 women in the district

जालना, पुढारी वृत्तसेवाः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा मिळणाऱ्या आर्थिक मदतीला जालना जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात योजनेचे एकूण ४ लाख ८४ हजार ६९४ लाभार्थी असताना, विविध कारणांमुळे तब्बल ८४ हजार ४१६ महिलांचे अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील केवळ ४ लाख २७८ महिलांनाच योजनेचा लाभमिळत आहे.

योजनेअंतर्गत पात्र महिलेच्या खात्यावर दरमहा १ हजार ५०० रुपये जमा केले जातात. त्यानुसार सध्या लाभ घेणाऱ्या ४ लाख २७८ महिलांसाठी शासनाला दरमहा सुमारे ६० कोटी ४ लाख १७ हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. मात्र, जिल्ह्यातील सर्व ४ लाख ८४ हजार ६९४ महिलांना अनुदान मिळत असताना दरमहा होणारा खर्च सुमारे ७२.७० कोटी रुपये इतका झाला असता. त्यामुळे मोठ्या संख्येने लाभार्थी वगळल्याने शासनाच्या खर्चातही मोठी घट झाली आहे.

दरम्यान, लाभार्थी महिलांच्या माहितीनुसार विविध कारणांमुळे अनुदान बंद झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पात्र असूनही लाभ थांबल्याचा दावा प्रति लाभार्थी अनुदान मासिक अनुदान खर्च ६०.०४ कोटी (सध्याचा) = सध्या लाभ घेणारे ४,००,२७८ = ₹१,५०० (प्रति लाभार्थी मासिक अनुदान) करणाऱ्या महिलांची संख्या मोठी असल्याने योजनेच्या लाभार्थी पडताळणी आणि पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

शासनाने योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी, उत्पन्नाची मर्यादा, शासकीय सेवेत असणे, आयकर भरणे आदी निकषांनुसार लाभार्थ्यांची छाननी केली आहे. या प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या किंवा आवश्यक निकषांची पूर्तता न झालेल्या महिलांचे अनुदान बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी या लाडक्या बहिणींना अनुदानापासून मुकावे लागले आहे.

जालना जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या एकूण ४ लाख ८४ हजार ६९४ लाभार्थ्यांपैकी विविध कारणांमुळे ८४ हजार ४१६ लाभार्थीचे अनुदान बंद झाले आहे. सध्या ४ लाख २७८ महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. लाभार्थ्यांची माहिती आणि निकषांनुसार ही प्रक्रिया करण्यात आली आहे.
- आर. व्ही. कड, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT