कर्जमाफीसाठी केवायसी आवश्यक  pudhari photo
जालना

Bank KYC for farmers scheme : कर्जमाफीसाठी केवायसी आवश्यक

पात्र शेतकऱ्यांनी कागदपत्रासह बँकेशी संपर्क करावा

पुढारी वृत्तसेवा

जालना : शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या बँक शाखेत तातडीने केवायसी कागदपत्रे अद्ययावत करणे गरजेचे आहे.

जालना जिल्ह्यात जवळपास पाच लाख शेतकरी असुन 3 लाख 50 हजार 934 शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असल्याची माहीती सुत्रांनी दिली. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे संबंधित बँक शाखेत सादर करावी लागणार आहेत.

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांना आधार कार्ड आणि इतर महत्त्वाची केवायसी कागदपत्रे तात्काळ अद्ययावत करण्यासाठी बँक शाखेत संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, त्यांना शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवता येईल.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी योग्य प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, शेतकऱ्यांना बँक शाखेत जावून केवायसी फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे.

प्रक्रिया पूर्ण करा

जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी केवायसी अपडेट करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करावी, असे जिल्हा बँक व्यवस्थापक मंगेश केदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT