Kundalika River pollution issue
जालना, पुढारी वृत्तसेवाः शहराजवळून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला सध्या जलपर्णीन विळखा घातला आहे. शिवाय, नदीचे वाहत्या पाण्याचा प्रवाह देखील मंदावला असल्याने काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याचे चित्र आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत असून डासांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जलपर्णीमुळे पाण्यातील विरघळ-लेल्या प्राणवायूचे प्रमाण घटते आणि मत्स्यसंपत्तीवरही परिणाम होतो. तसेच पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते. नदीकाठावरील रहिवाशांनी तातडीने यांत्रिक पद्धतीने जलपर्णी काढण्याची आणि नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. नगरपालिकेने संबंधित जालना : कुंडलिका नदीच्या पात्रात अशा प्रमाणे जलपणीं वाढत आहे. यामुळे पाणी दूषित होत असून, दुर्गंधी सुटली आहे.
विभागाच्या माध्यमातून पाहणी करून लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नदी संवर्धनासाठी नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा असून कचरा टाकणे थांबविणे आणि जनजागृती करणे आवश्यक आहे. नदीचे अस्तित्व आणि पर्यावरणीय संतुलन टिकवण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे.
कुंडलिका सीना नदी स्वच्छ, रुंदीकरण व खोलीकरणाचे काम संस्थेने केले. हे काम झाल्यानंतर महानगरपालिकेने कायम ठेवणे गरजेचे असताना त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले. नदीत जलपर्णीनी विळखा घातला आहे. पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.रमेश देहेडकर, सामाजिक कार्यकर्ते, जालना.
जलपर्णी का ठरते धोकादायक ?
जलपर्णी ही जलवनस्पती अतिशय वेगाने वाढते आणि अल्पावधीत संपूर्ण पाणीसाठ्यावर पसरते. तिच्या दाट थरामुळे सूर्यप्रकाश पाण्याच्या तळापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे जलीय वनस्पती आणि मासे यांचे जीवन धोक्यात येते. पाण्यातील प्राणवायू कमी झाल्याने जैवविविधतेवर परिणाम होतो. तसेच साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढून मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.