आन्वा ः कुकडी येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम बंद आहे.  (छाया ः सादिक शेख)
जालना

Solar power project : सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम चार महिन्यांपासून बंद

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून काम सुरू करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

आन्वा ः भोकरदन तालुक्यातील कुकडी या ठिकाणी गायरानात उभारल्या जात असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम चार महिन्यांपासून बंद आहे. या भागातील काही शेतकऱ्यांनी अडवणूक केल्याने हे काम रखडले असून परिसरातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाची प्रतीक्षेत आहेत. वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून प्रकल्पाचे काम सुरू करण्याची मागणी होत आहे.

भोकरदन तालुक्यातील दानापूर परिसरातील शेतकऱ्यांसाठी ऊर्जा क्रांतीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कुकडी येथे 8 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची भारनियमनाच्या कचाट्यातून कायमस्वरूपी मुक्तता झाली असून त्यांना आता शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे.

गेली अनेक वर्षांपासून शेतीसाठी - रात्रीच्या वेळी मिळणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना अंधारात पिकांना पाणी देण्यासाठी जागरण करावे लागत होते. रात्रपाळीत होणाऱ्या या पुरवठ्यामुळे साप, विंचू, बिबट्या, आणि अन्य निशाचर प्राण्यांचा सामना करण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात कायम होती. या त्रासातून आता बळीराजाची सुटका झाली आहे.

दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सिंचनासाठी आवश्यक असलेली वीज वेळेवर मिळाल्याने शेतीची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे.

  • विजेचा अडथळा टाळल्याने पिकांचे नुकसानही टळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र गेल्या चार महिन्यांपासून हे काम बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT