'Kokada' infestation on chilli crops in the Shelud area
पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : यंदा मिरची लागवडीतून चांगले उत्पादन मिळून आर्थिक स्थैर्यता येईल, या आशेने भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील शेतकऱ्याने मिरचीची लागवड केली. बी, बियाणे, खत, औधषे दिली. मात्र, ऐन भरात आलेल्या मिरचीवर कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्याचे दोन एकरावरील पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
दरम्यान, भोकरदन तालुक्यातील शेलुद व परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड करण्यात आली होती. पिंपळगाव रेणुकाई ही मिरची खरेदी-विक्रीची मोठी बाजारपेठ असल्याने येथील २५ ते ३० गावांतील शेतकरी दरवर्षी मिरचीचे उत्पादन घेतात.
यंदा मात्र जून महिना संपत आला तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पिके २००० रुपये प्रति टँकर मोजून विहिरीत खर्चात मोठी वाढ झाली आहे. 'दुष्काळात तेरावा महिना' म्हणीप्रमाणे आता मिरचीवर 'कोकडा' अर्थात चुरडा-
मी एप्रिल महिन्यामध्ये मिरची लागवड केली होती त्यामध्ये काही दिवस विहिरींना मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा उपलब्ध होता परंतु विहिरींनी तळ गाठल्याने मी बाहेरून टँकर दोरे विकत घेऊन विहिरींना पाणी सोडले परंतु त्यात कोकडा रोग पडल्याने माझी दोन एकर मिरची निकामी झाली आहे त्यामुळे आर्थिक मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने काहीतरी उपाययोजना करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी- विठ्ठल खडके, मिरची उत्पादक शेतकरी, शेलुद