Kharif Crops : सहा लाख हेक्टरवरील खरिपाचे पीक धोक्यात file photo
जालना

Kharif Crops : सहा लाख हेक्टरवरील खरिपाचे पीक धोक्यात

सोयाबिन, कपाशी माना टाकू लागल्याने शेतकरी धास्तावले

पुढारी वृत्तसेवा

Kharif crops on six lakh hectares at risk

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यात जवळपास एक महिन्यापासुन पावसाने दडी मारल्याने सुमारे सहा लाख हेक्टरवरील खरीपाची लागवड धोक्यात आले आहे. आकाशात गर्दी करणारे ढग पाऊस न पाडताच पांगत असल्याने आशा निराशेच्या झोक्यावर झुलणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला आहे. सोयाबीन, लागला कपाशी, मकासह इतर पिके पाण्याअभावी माना टाकु लागली असल्याने चिंता वाढली आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात यावर्षी रिमझीम पावसावर खरीपाची पिके तग धरुन होती. मात्र ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने सहा लाख हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, मका, तुरीसह इतर पिके पाण्याअभावी माना टाकु लागली आहेत. जिल्ह्यात पावसाचे तीन महिने उलटुनही मोठे पाऊस पडले नसल्याने ७ मध्यम व ६० लघु तलावात नगण्य पाणीसाठा आहे. मोठे पाऊस नसल्याने नदी, ओढे कोरडेच असल्याने विहीर व बोअरच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही.

पाऊस थांबल्याने पिके माना टाकत असतांनाच विहीर व बोअरलाही पाणी नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सोयाबीनला काही ठिकाणी फुले लागली असुन काही ठिकाणी कोवळ्या शेंगा लागल्या आहेत. मात्र पाण्याअभावी फुल गळ होत असतांनाच शेंगाही बारीक पडत आहेत. लाखो रुपयांचा खर्च करुन हातातोंडाशी आलेली पिके पावसाअभावी जळत असल्याने शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे. आगामी तीन ते चार दिवसात पाऊस न पडल्यास खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे.

ज्यी शेतकऱ्यांकडे विहीरी व बोअर आहेत त्यां चीही अवस्था विहीरी व बोअरमधे पाणी नसल्याने कोरडवाहु शेतकऱ्यांसारखी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे वरुण राजाच्या आगमनाकडे लागल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पहावयास मिळत आहे.

कृत्रिम पावसाची मागणी

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थीतीच्या पार्श्वभुमीवर जालन्याचे आ. अर्जुनराव खोतकर यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याकडे कृत्रीम पाऊस पाडण्याची मागणी केली आहे. आगामी काही दिवसात पाऊस न पडल्यास खरीप पिक हातातुन जाण्याची भिती लक्षात घेउन कृत्रीम पावसाच्या मागणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT