जालना : घरफोडीच्या गुन्ह्यात जेरबंद केलेल्या आरोपीसह पोलिस अधिकारी.  (छाया : शरद खानापुरे )
जालना

Jalna Crime : घरफोडी प्रकरणात दोन आरोपींना केले जेरबंद

सव्वा चार लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडीचे तीन गुन्हे उघड

पुढारी वृत्तसेवा

जालना : शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत कदीम जालना पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात यश मिळवले असून त्यांच्याकडून सुमारे ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून घरफोडीच्या तीन गुन्ह्यांची उकल झाली असून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुन्या जालना परिसरातील तुलशी पार्क भागातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी १५ जून रोजी मध्यरात्री नंतर रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी केले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना कदीम जालना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेतले.

चौकशी दरम्यान आरोपींने संशयित आरोपी अजय शंकर वर्मा याच्याकडे चोरीतील मुद्देमाल ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून दीड तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, एक तोळे वजनाचे सोन्याचे झुंबर तसेच एक मोटारसायकल असा ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत चोरीचा काही माल हस्तगत करण्यात आला असून आरोपींकडून आणखी दोन गुन्हे उघडकीस करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शक्तीसिंग प्रल्हादसिंग टाक ( रा. नवीन जालना) व अजय शंकर वर्मा (वय 28, व्यवसाय सोनार, रा. नवीन जालना) यांना अटक करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेघबीरसिंह संधु, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जे.बी.शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक मच्छिाद्र वाघ, जमादार सदा राठोड, सचिन चौधरी, बाबा गायकवाड, मतीन शेख,इम्रान खान, दिलीप गायकवाड यांच्यासह इतरांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT