Beed crime | २४ तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड; दोन आरोपी अटकेत, मुद्देमाल व हत्यारे जप्त

Beed crime | २४ तासांत दोन चोरीचे गुन्हे उघड; दोन आरोपी अटकेत, मुद्देमाल व हत्यारे जप्त
Published on
Updated on

अतूल शिनगारे

धारूर : धारूर पोलिसांनी जलद व प्रभावी कारवाई करत जबरी चोरीसह दोन गुन्ह्यांचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून, मोठ्या प्रमाणात मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दीड तासांतच पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १३०/२०२६ अंतर्गत फिर्यादी भागवत बबन कांबळे यांच्या तक्रारीनुसार ६ एप्रिल रोजी आंबेवडगाव–धारूर मार्गावरील शिवराज ढाबा परिसरात उभी असलेल्या पिकअप वाहनातून जे.एस.डब्ल्यू. कंपनीचे रंगाचे (पेंट) डबे चोरीला गेले होते. या प्रकरणात पोलिसांनी सुमारे ७३०३० रुपयांचा रंगाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.तपासादरम्यान पोलिसांनी मनोज ऊर्फ सोन्या चंद्रकांत घोळवे (वय १९, रा. आंबेवडगाव) व सुमित प्रमोद कंगने (वय १९, रा. धूनकवाड, ता. धारूर) या दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल मेमोरँडम पंचनाम्यानुसार जप्त करण्यात आला. तसेच आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती ८०० चारचाकी गाडी, एअर गन, चाकू, कोयता व मास्क असा हत्यारसामग्रीही जप्त करण्यात आली आहे.

याच दरम्यान घडलेल्या दुसऱ्या घटनेत चोरंबा येथील बाळू भारत भालेराव यांना अडवून त्यांच्या जवळील मोबाईल व खिशातील अडीच हजार रुपये नगदी जबरदस्तीने चोरून नेण्यात आले होते. या घटनेत मोबाईल व नगदी मिळून सुमारे १७,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या गुन्ह्यातील मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब भवर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भताने, हेड कॉन्स्टेबल मुंडे, गोविंद खाडे, शेख जमीर, अशोक कदम, मेजर शेख आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.दरम्यान, उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, अटक आरोपींचा पोलीस कोठडी रिमांड घेऊन आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news