शहागड : जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा गहू, हरभरा, उन्हाळी ज्वारी, टरबुजासह ऊस पिकांसाठी फायदा होणार आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाळा लागत असल्याने सध्या तापमान वाढ होत असून या भागात ऊसतोडणी झाल्यानंतर नवीन एकल व दुसऱ्या तसेच तिसऱ्या पाळीच्या उसाला पाणी देण्याचे शेतकऱ्यांचे नियोजन असून, तसेच गहू, हरभरा, उन्हाळी ज्वारी, उन्हाळी सोयाबीन, टरबूज - खरबूज, मोसंबी फळबांगासह, उन्हाळी पिकांना या आठवड्यासह पुढील मार्च महिन्याच्या पहिल्या व दुसरा आठवड्यापर्यंत पाणी शेतकऱ्यांना पिकांना उपलब्ध व्हावे. यासाठी जायकवाडीच्या नाथसागर जलाशयातून उन्हाळी पिकासाठी पाणी सोडण्यात आलेले असून. शेतकरी लाईटच्या उपलब्धतेनुसार पाणी उपसा करून शेतामध्ये सऱ्यांच्या व ठिबकच्या माध्यमातून पिकांना पाणी देत आहे.
लवकरच गहू हरभरा, टरबूज खरबूज काढणीला येऊन परिसरात नव्याने ऊस लागवडीचा हंगामा चालू होईल. यासाठी शेतकऱ्यांच्या या पाण्यामुळे विहिरी व बोरला लाभ होईल. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी आहेत ते आपल्या विहिरी भरून घेत असून, जनावरांनाही पिण्याचे पाणी उपलब्ध झालेले असून, तापमान वाढत असल्याने या पाण्याचे बाष्पीभवन तसेच हा कालवा दुरुस्त नसल्याने मातीमुळे पाणी झिरपत आहे.
याकडे लक्ष वेधण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आसून मागील वर्षी या कालव्यात पाणी सोडण्यासाठी आमदारांसह अनेक नेत्यांनी व शेतकऱ्यांनी आंदोलने केलेली होती. या वर्षी जायकवाडी जलाशयामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे.
माजी मंत्री राजेश टोपे यांनी कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना पुढील वर्षी जास्तीच्या कालावधीसाठी चालावा यासाठी कारखाना परिसरातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उसाच्या शेतीवर भर द्यावा व ऊस लागवड करावी, असे आवाहन केलेले आहे