जामखेड ः हुरडा पार्टीत गव्हाच्या ओब्या भाजून घेताना शेतकरी. pudhari photo
जालना

Hurda party in Jamkhed : जामखेड शेतात रंगताहेत हुरडा पार्टी

ग्रामीण संस्कृतीचा सुगंध दरवळला

पुढारी वृत्तसेवा

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड परिसरात पारंपरिक हुरडा पार्टीचा जल्लोष रंगला. हिरव्यागार गव्हाच्या पिकात, अंगाराच्या मंद आचेवर भाजल्या जाणाऱ्या ओब्यांचा दरवळता सुगंध आणि शेतातील नैसर्गिक वातावरण यामुळे अर्जुन भोजने यांच्या शेतात अविस्मरणीय असा ग्रामीण मेळा भरला होता.

शेतातच लाकडांच्या अंगारावर ताज्या गव्हाच्या ओब्यांना सावकाश भाजून गरमागरम हुरडा तयार करण्यात आला. भाजलेल्या कणसांमधून अलगद काढलेला नरम, सुगंधी हुरडा उपस्थितांनी चटणी, दही, चिवडा, खमंग भजे आणि पारंपरिक धपाट्यांसह मनसोक्त आस्वादला. ग्रामीण चवीचा आणि मातीतल्या संस्कृतीचा संगम अनुभवताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

हिवाळ्यातील ग्रामीण परंपरेचे जतन करणारा हा उपक्रम असल्याची भावना व्यक्त केली. शहरातील धकाधकीच्या जीवनापासून दूर, निसर्गाच्या सान्निध्यात साजरी झालेली ही हुरडा पार्टी केवळ मेजवानी नव्हे, तर एक भावनिक आणि सांस्कृतिक अनुभव ठरली. ग्रामीण जीवनशैलीचा सुगंध दरवळवत, रंगलेली ही हुरडा पार्टी सर्वांच्या मनात गोड आठवण बनून राहिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT