Crime  
जालना

Jalna Crime | तरुणाच्या मृत्यूप्रकरणी बेलगाव, गेवराईतील पाच जणांविरोधात गुन्हा; व्याजाच्या व्यवहारातून छळ

व्याजाच्या पैशांच्या व्यवहारातून होणारा कथित मानसिक व शारीरिक छळ आणि त्यातून घडणाऱ्या गंभीर घटना हा चिंतेचा विषय

पुढारी वृत्तसेवा

Youth Death Case Jalna

शहागड : व्याजाच्या पैशांच्या व्यवहारातून एका तरुणाला मानसिक व शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

व्याजाच्या व्यवहारातून छळ केल्याचा आरोप

फिर्यादी दीपक शिंदे यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ विलास शिंदे याला संबंधित पाच जणांनी व्याजाच्या पैशांच्या व्यवहारातून एकत्रितपणे शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विलास याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादी दीपक शिंदे यांच्या तक्रारीवरून रामनाथ बेद्रे, पोपट धनगर, बन्शी गव्हाणे तिन्ही (रा.बेलगाव. ता. गेवराई), शुभम रोकडे (रा.गेवराई), उमेश गुंड (रा.नागझरी), गोंदी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील गुन्हा पोलीस उपनिरीक्षक एस. एम. मुपडे यांनी दाखल करून घेतला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार फुलचंद हजारे हे करीत आहेत.

खाजगी सावकारीच्या व्यवहारांवर पुन्हा प्रश्नचिन्ह

व्याजाच्या पैशांच्या व्यवहारातून होणारा कथित मानसिक व शारीरिक छळ आणि त्यातून घडणाऱ्या गंभीर घटना हा चिंतेचा विषय बनत आहे. या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून सखोल चौकशी होणे आवश्यक असून, दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT