गोदावरी लॉन्स pudhari photo
जालना

Jalna wedding theft : लग्नसोहळ्यातुन 27 लाखाचा मुद्देमाल लंपास

Jalna theft : वीस ते पंचवीस तोळे सोन्यासह दोन आयफोन व रोख लंपास

पुढारी वृत्तसेवा

Jalna marriage ceremony robbery

वडीगोद्री : अंबड तालुक्यातील अंकुश नगर येथील गोदावरी लॉन्स येथे आयोजित लग्नसोहळ्यातुन वीस ते पंचवीस तोळे सोन्यासह एक आयफोन व 50 हजार रुपये रोख लंपास करण्यात आल्याची घटना रविवारी घडली.

अंबड तालुक्यातील अंकुश नगर येथे गोदावरी लॉन्स येथे अनिरुद्ध झिंजुर्डे यांची मुलगी डॉ शुभांगी व मातोरी येथील डॉ विजयकुमार जरांगे यांचा विवाह सोहळा होता . नवरी - नवरदेवाचे लग्नासाठी आणलेले वीस ते पंचवीस तोळे सोने असलेली बॅग व दोन आयफोन मोबाइल आणि 50 हजार रुपये कॅश असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले असून, आयफोन मोबाइलच्या लोकेशनवर चोराचा शोध घेण्यात येत आहेत.

नवरदेवाची करवली व नवरीचे 20 ते 25 तोळे सोन्याचे दागिने यावेळी चोरुन नेल्याची घटना दुपारी समर्थ सहकारी साखर कारखाना येथील गोदावरी मंगल कार्यालयात घडली. पर्स मधील आयफोनमुळे चोरांचे लोकेशन घेण्याचे काम सध्या सुरू असून वडीगोद्री येथील पारधी वस्तीपर्यंत पोलिस तपास करत गेले आहेत.

समर्थ कारखाना जवळील गोदावरी मंगल कार्यालयात दुपारी डॉ. शुभांगी व मातोरी येथील डॉ. विजयकुमार जरांगे यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. नवरदेवाच्या बहीणीने जेवणाला बसताना दुपारी दोन वाजता स्वतःसह नवरीचे सोने तसेच पन्‍नास हजार रुपये रोख तसेच सॅमसंग मोबाईल,एक आयफोन पर्समध्ये ठेवुन ते जेवणाच्या पंक्तीत मुलांना जेवु घालत असताना करवलीची चोरट्यांनी दिशाभूल करत तीची पर्स पळविली.

यावेळी केटरर्सच्या कर्मचार्‍याने त्या महिलेला चोरी करताना पाहिले परंतु त्या महिला चोरांनी त्या केटरर्स कर्मचार्‍यास दम देऊन पर्स पळविल्याचे समजते. पर्समधील सॅमसंग मोबाईल फोन बंद करता आला. परंतु आयफोन बंद करता न झाल्याने वधुचा भाऊ पोलिस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे यांनी आयफोन चे लोकेशन चेक केले. यावेळी ते वडीगोद्री येथे दाखविण्यात आले, लोकशेन दाखवल्याने त्या ठिकाणी ग्रामस्थ गेले असता महिला अंगावर आल्याने ते माघारी गेले.

त्यानंतर आमदार नारायण कुचे यांनी घटनेची दखल घेऊन पोलिसांशी संपर्क केला. गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष खांडेकर हे पोलिस ताफ्यासह तेथे दाखल झाले असुन ते चोरट्यांच्या मागावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT