जालना: दु:खीनगरमध्ये अशा प्रकारे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. pudhari photo
जालना

Jalna garbage issue : प्रभाग क्र.११ मध्ये पसरले घाणीचे साम्राज्य; कचऱ्याचे ढीग साचले

दुःखी नगर–बजाज गोडाऊन परिसरात डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधीने हैराण

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील दुःखीनगर व बजाज गोडाऊन परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याने आणि दुर्गंधी पसरल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

परिसरात सर्वत्र कचरा साचल्यामुळे दुर्गंधी पसरत असून, साचलेल्या घाणीत डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया तसेच इतर साथीच्या आजारांचा धोका वाढल्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. अनेकवेळा तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा स्‍थानिक नागरिक करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT