Jalna Two arrested in grant scam
जालना, पुढारी वृत्तसेवाः अंबड व घनसावंगी तालुक्यात २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा नैसर्गीक अनुदान घोटाळ्यातील तलाठी किरण जाधव व त्यास सहाय्य करणारा कोतवालास आर्थीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालया समोर उभे केले असता त्यांना १० डिसेबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये शासनाने वेळो वेळी चार वेळेस जी. आर. काढुन बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. त्यामध्ये अंबड व घनसावंगी तालुक्यात यादया अपलोडींगचे काम करणारू संबधीत काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस (शेती नावावर नसलेल्या) नावे यादया मध्ये अपलोड करुन अनुदानाची रकम हडप केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकरणात सत्यता पडताळणी साठी चौकशी समीती गठीत केली होती.
चौकशी समीतीने चौकशी करुन २४० गावामध्ये २४कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपये इतक्या शासकीय रकमेचा अपहार केल्याचा अहवाल दिला होता. या प्रकरणात अंबड पोलिस ठाण्यात २८ आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १० आरोपीना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. फिर्यादी मधील आरोपीना मदत करणारे खाजगी एंजट आणि तलाठ्यांचे सहाय्यक कोतवाल हे सुध्दा तपासात दोषी आढळून आले असल्याने त्यांचे सहभाग निष्पन्न करुन त्यांच्या सहभागाप्रमाणे व मिळालेल्या पुराव्याच्या आधारे कोतवाल व खाजगी एंजट यांना सुध्दा गुन्हयात अटक करण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर आरोपीची संख्या वाढत आहे.
आर्थीक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने ६ डिसेंबर रोजी तलाठी व गुन्हयातील फरार आरोपींचा शोध घेत असताना अंबड तालुक्यातील पानेगाव सजाचे तलाठी आरोपी किरण रविंद्र जाधव यास छत्रपती संभाजीनगर येथे अटक करण्यात आली. आरोपीकडे केलेल्या चौकशीत निष्पन्न झालेल्या पुराव्या आधारे तलाठी किरण जाधव याचा सहाय्यक कोतवाल अशोक रामभाऊ शिंदे यास ६ डिसेंबर रोजी रात्री उशीराने अटक करण्यात आली. दोन्ही आरोपीताना अंबड न्यायालयात हजर केले असता आरोपींना १० डिंसेबर पर्यंत पोलिस कोठडी मंजुर केली आहे.
यांनी केली कामगिरी
सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, आर्थीक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस उपअधिक्षक सिध्दार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस अंमलदार गोकुळसींग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार, जयश्री निकम, निमा घनघाव, मंदा नाटकर यांनी केली आहे.