जलवाहिनीवर चोरट्यांचा डल्ला; लोखंडी गडर लंपास file photo
जालना

जलवाहिनीवर चोरट्यांचा डल्ला; लोखंडी गडर लंपास

महापालिकेची चंदनझिरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल; कन्हैयानगर परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

jalna Thieves stole the water pipe; also stole the iron gadar

जालना, पुढारी वृत्तसेवा : चोरट्यांनी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील गडरवर डल्ला मारला आहे. यामुळे नवीन जालना शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जालना महानगरपालिका हद्दीत पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील लोखंडी गडर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नवीन जालना शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संत गाडगेबाबा जलाशय (घाणेवाडी) ते जलशुद्धीकरण केंद्र या दरम्यान असलेल्या मुख्य पाईपलाईनवर कन्हैयानगर भागातील नाल्यावरील पुलावर सुमारे 20 फुटांचे लोखंडी गडर बसवण्यात आले होते. 23 फेब्रुवारीच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी हे गडर चोरून नेले. या गडरची किंमत सुमारे 15 हजार रुपये असून वजन दीड क्विंटलच्या आसपास आहे.

महत्त्वाचे म्हणजे, हे गडर थेट चालू असलेल्या पाणीपुरवठा लाईनवर बसवलेले असल्याने त्याच्या चोरीमुळे तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे नवीन जालना शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, चोरीदरम्यान मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही माहिती मनपाकडून देण्यात आली. या प्रकरणी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने चंदनझिरा पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध सुरू

घाणेवाडी जलाशयातून नवीन जालना भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे गड चोरी गेल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने चंदनझिरा पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकारणी पोलिस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

पाण्याची गैरसोय होणार नाही : बगळे घाणेवाडी जलशयातून नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे गडर चोरट्यांनी चोरून नेले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरवासीयांच्या पाणी पुरवठ्यात अडथळा येणार नाही.
-राजेश बगळे, नगर अभियंता, पाणी पुरवठा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT