कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात व्यावसायिकाचा मृतदेह  File Photo
जालना

Jalna Crime News : कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात व्यावसायिकाचा मृतदेह

गावठी कट्टयातून गोळी झाडून जीवन संपवल्याचा संशय

पुढारी वृत्तसेवा

jalna The body of a businessman was found in the car.

जालना,पुढारी वृत्तसेवा ः जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात असलेल्या कलावती हॉस्पीटल समोर व्यावसायीक सागर श्रीराम धानुरे (30)यांचा मृतदेह रविवारी सकाळी पाच वाजेच्या सुमारास कारमधे रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने खळबळ उडाली.गावठी पिस्तुलमधुन त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या असुन हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय आहे.दरम्यान नातेवाईकांनी मृत्युबाबत सांशकता व्यक्त केल्याने पेच वाढला आहे.

जालना शहरातील तुळजाभवानी परिसरात राहणारे व्यावसायीक सागर श्रीराम धानुरे हे शनिवारी घरातुन गेल्यानंतर ते घरी परतले नव्हते.यामुळे त्याचे मित्र व नातेवाईक त्याचा शोध घेत असतांना त्याची कार (क्र एमएच-21-बीएम-1991)ही अंबड चौफुली परिसरातील कलावती हॉस्पीटल परिसरात रविवारी सकाळी निदर्शनास आली.कार मधे रक्ताच्या थोराळ्या मृतदेह पाहुन प्रत्यक्षदर्शीनी कदीम जालना पोलिस ठाण्यास भ्रमणध्वनीवरुन या बाबत माहीती दिली.

घटनास्थळी कदीम जालना पेलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जनार्धन शेवाळे यांच्यासह कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस दाखल झाले.यावेळी फिंगर प्रिंट एक्सपर्ट व फॉरेन्सीक लॅब पथकासही पाचारण करण्यात आले होते.

सागर धानुरे याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला असता डॉक्टरांनी त्यास मृत झाल्याचे घोषीत केले. कारमधे गावठी पिस्टलसह काडतुस तसेच दोन मोबाईल आढळुन आले.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असुन घटनास्थळावरील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत.

दरम्यान सागर याच्या आत्महत्येबाबत नातेवाईकांनी साशंकता व्यक्त केल्याने हा खुन कि आत्महत्या अशी चर्चा एैकावयास मिळाली.

एक महिन्यापूर्वी झाली होती हत्या

व्यावसायीकाचा मृतदेह कारमधे सापडल्याच्या घटनेपुर्वी याच परिसरात भर दिवसा एका जणाची तलवारीने हत्या करण्यात आली होती.या घटनेस एक महीना होत नाही तोच अंबड चौफुली परिसरात व्यावसायीकाचा मृतदेह आढळुन आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT