Jalna Chain Snatching pudhari photo
जालना

Jalna Chain Snatching : शिक्षिकेच्या गळ्यातील २० हजारांचे मंगळसूत्र हिसकावले

संभाजीनगर भागात चेन स्नॅचिंग; गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जालना: शहरातील संभाजीनगर परिसरात घराबाहेरील अंगणात साफसफाई करत असताना एका दुचाकीस्वार चोरट्याने शिक्षिकेच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहेे. ही घटना लोहिया हॉस्पिटलजवळ, ब्लुमिंग बर्ड शाळेच्या पाठीमागे घडली.

फिर्यादी मीनाक्षी अशोकराव पांगारकर (मानसुरे) (वय ४९, रा. लोहिया हॉस्पिटलजवळ, ब्लुमिंग बर्ड शाळेच्या पाठीमागे, संभाजीनगर, जालना) या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पिर पिंपळगाव येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवार, दि. २० रोजी सकाळी ७:५० वाजेच्या सुमारास त्या आपल्या राहत्या घराच्या बाहेरील अंगणात साफसफाई करत होत्या.

त्याचवेळी पाठीमागून मोटारसायकलवर आलेला एक अज्ञात इसम अचानक त्यांच्यासमोर आला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकीवरून भरधाव वेगात पळून गेला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यानंतर त्यांनी पती प्रकाश प्रल्हादराव मानसुरे यांना या प्रकाराची माहिती देऊन पोलिसांत धाव घेतली.

चोरट्याने अंदाजे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (ज्यात २० छोटे मणी १ ग्रॅम, १० मोठे मणी १ ग्रॅम, दोन डोरले व चार मणी अंदाजे ५ ग्रॅम) एकूण किंमत २०,००० रुपये लंपास केले ओह. या प्रकरणी शिक्षिका मीनाक्षी पांगारकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT